जामखेड न्युज——–
पोदार शाळेतील मुले भविष्यात अधिकारी होतील – डीवायएसपी आण्णासाहेब जाधव
कालिका पोदार लर्न स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
जामखेड येथील पोदार शाळेत विद्यार्थ्यांची सर्वागीण तयारी करून घेतली जात आहे. स्पर्धा परिक्षाबाबत मार्गदर्शन व तयारी करून घेतली जात आहे यामुळे भविष्यात अनेक विद्यार्थी उच्च अधिकारी होतील असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी व्यक्त केले.
कालिका पोदार लर्न स्कूल (CBSE) जामखेड मध्ये यावर्षीचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यावर्षीची (थीम) विषय होता वसुधैव कुटुम्बकम या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री अण्णासाहेब जाधव (डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अहमदनगर ) त्याचप्रमाणे मा. श्रीमती प्रतिक्षा जोहरी (प्राचार्य पोदार इंटरनॅशनल स्कुल बीड ) मा.श्री संभाजी गायकवाड (पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जामखेड) मा.श्री योगेश इरतकर ( प्राचार्य पोदार लर्न स्कुल केज) मा. श्री विशाल कोकरे व मा. श्री अरगडे सर (संस्थापक पोदार लर्न स्कुल उमरगा ) मा. श्री योगेश कुलकर्णी (स्पोर्ट हेड ऑफ डिपार्टमेंट जैन इंटरनॅशनल स्कूल औरंगाबाद) त्याचबरोबर कालिका पोदार लर्न स्कूल (CBSE) चे संस्थापक मा.श्री उमाकांत अंदुरे, मा.श्री नितिन तवटे, मा.श्री प्रशांत कानडे, मा श्री निलेश तवटे,मा.श्री सागर अंदुरे व पालक शिक्षक संघाचे सदस्य,पत्रकार,पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कालिका पोदार लर्न स्कूलचे संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली बहारदार गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली माननीय प्राचार्य श्री प्रशांत जोशी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य यांचे झाले त्यात त्यांनी यावर्षी घेतलेल्या विविध कार्यक्रमाचे व विद्यार्थी उपयोगी प्रयोजनांचे वाचन केले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था नेहमी बांधेल असेल असे त्यांनी प्रमाणित केले
यावेळी बोलताना पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव म्हणाले की, या शाळेत खरोखरच विविधांगी उपक्रमातून विद्यार्थ्यांना संस्कार सोबतच शारिरीक व बौद्धिक विकास या गुणांना वाव दिला जात आहे व या कार्यक्रमासाठी त्यांनी शाळेचे अभिनंदन केले.
यानंतर विविधरंगी कार्यक्रमास सुरुवात झाली.यामध्ये वसुधैव कुटुम्बकम ही संकल्पना विद्यार्थ्यांनी विविध नृत्यविष्कारातून प्रतिबिंबित केले.या संदेशातून संपूर्ण मानवतेचे दर्शन घडविले.त्याचबरोबर स्कूलच्या बागेमध्ये विविधरंगी फुलांच्या सुगंधाने प्रेक्षकांचे मन रिजवण्यासाठी पोद्दार जम्बो किडच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करत आपली चुणूक दाखविली.शेवटी अखंडविश्वाचे हित जोपासणारी पसायदान ही प्रार्थना घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि.रुद्राक्ष बांगर, चि.ओम गर्जे, चि.कुशल साबळे, कु.खुशी गंडाळ, कु.तृप्ती डोके, कु.गार्गी अवसरे कु. वृषाली जाधवर,कु. प्राजक्ता ढगे, चि. स्वराज आष्टेकर,चि.यश गवळी,कु. प्रियल बोथरा, कु.सिद्धी मुरकुटे, कु.शिवानी पोटे,कु.लब्धी फिरोदिया,कु.श्रेया कार्ले, या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमास उठाव आणला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार प्रदर्शन केले .