उपक्रमशील शिक्षक विजय जाधव यांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान

0
157

जामखेड न्युज——

उपक्रमशील शिक्षक विजय जाधव यांना राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान

इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर मार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी जि.प.प्रा मोहा ता. जामखेड शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. विजय जाधव सर यांना नाशिक पदवीधर मतदार संघाचे मा.आमदार सुधीरजी तांबे साहेब तसेच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा.डॉ. श्री. बी.जी. शेखर पाटील साहेब संगमनेर ग.शि.अ .फटांगरे मॅडम तसेच इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षा सौ. वृषाली कडलग मॅडम, संगमनेर मालपाणी उद्योग समुहाच्या सौ. रचना मालपाणी आणि सर्व टिमच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण , वार्षिक स्नेहसंमलेन , शैक्षणिक सहल ,सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव झटणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.


सामाजिक उत्तरदायित्व म्हणून निवारा बालगृह येथे श्री. जाधव हे वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी निराधार व गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतात. पुरस्कार निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. श्री. प्रकाश पोळ साहेब, ग.शि.अ. मा.श्री. कैलास खैरे साहेब यांनी देखील श्री. विजय जाधव सर यांचे अभिनंदन केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here