जामखेड न्युज——
सनराईज शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांची रायगडावर स्वच्छता मोहीम
सनराईज शैक्षणिक संकुलाच्या साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी यांची शैक्षणिक सहल सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती यावेळी रायगड किल्ला परिसर पाहत असताना किल्ला परिसरात काही ठिकाणी अस्वच्छता दिसली यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबवली यामुळे सर्वाचे कौतुक होत आहे.
सनराईज शैक्षणिक संकुलाच्या साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेज पाडळी यांची शैक्षणिक सहल कोल्हापूर दर्शन, नानिज, गणपतीपुळे तसेच किल्ले श्रीमान रायगड प्रतापगड महाड महाबळेश्वर वाई येथे गेली असता या संकुलाच्या मुलांनी किल्ले रायगड वर स्वच्छता मोहीम राबवली या वेळी मुलांनी तसेच सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) प्रा. बहीर प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा भोंडवे, प्रा कदम, भोरे मॅडम दंडवते मॅडम काळे मॅडम शिक्षक विद्यार्थी यांनी सामाजिक बांधिलकी जपली व तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे मह्त्व सांगितले
सहल ७ ते ९ फेब्रुवारी ला संपन्न झाली स्वच्छता मोहिमेमुळे परिसरात विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे.