जामखेड न्युज——
डॉ. संजय भोरे यांच्या प्रयत्नातून दैवदैठण जिल्हा परिषद शाळेची माॅडेल स्कुल म्हणून निवड!!
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची शैक्षणिक सुविधा मिळणार

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची माॅडेल स्कूल योजनेत निवड झाली असून डॉ. संजय भोरे यांनी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
या योजनेअंतर्गत ७९ लाख रुपये मंजूर झाले असून यातून साधारण चार व्हाॅल बांधले जाणार आहेत. देवदैठण येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवी पर्यंत शाळा आहे. मिळालेल्या योजनेतील कामामुळे येथील मुलांना एक चांगली प्रशस्त इमारत मिळणार आहे.

देवदैठण या ठिकाणी जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत, एका खासगी संस्थेची आठवी ते दहावीपर्यंत तर सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा या संस्थेचे ज्युनियर कॉलेज आहे. या संस्थांमुळे येथील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या आहेत.
आपल्या सनराईज शैक्षणिक संकुल पाडळी फाटा या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील पाडळी फाटा, कुसडगाव व देवदैठण याठिकाणी विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे डॉ. संजय भोरे यांनी आपल्या गावातील मुलांसाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, आ. प्रा. राम शिंदे व खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातून एकमेव आपले गांव देवदैठण हे जिल्हा नियोजनातून माॅडेल स्कूल योजनेत बसवले आहे.
तसेच डॉ. संजय भोरे हे दैवदैठण गावाच्या विकासासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आ. राम शिंदे व खा. सुजय विखे यांच्या नेहमीच संपर्कात असतात.
चौकट
दैवदैठण हे जामखेड तालुक्यातील माॅडेल स्कूल निवडलेले एकमेव गाव आहे. देवदैठणचा या योजनेत सामावेश केल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार
डॉ. संजय भोरे
अध्यक्ष सनराईज शैक्षणिक संकुल






