सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

0
220

जामखेड न्युज——

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जामखेड शहरातील संभाजीनगर भागातील प्रतिक्षा विजय चव्हाण या विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आत्महत्या ग्रस्त मयत प्रतिक्षा हीस तुझ्या बापाकडून गाडी घेणे करिता पाच लाख रुपये घेऊन ये, तसेच तुला स्वयंपाक भाजी नीट येत नाही. लग्नात हुंडा दिला नाही.असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करून तिचा वेळोवेळी मानसिक, शारीरिक छळ, करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने या घटनेतील मयत प्रतीक्षा विजय चव्हाण, (वय २२ वर्ष) यांनी आपले राहाते घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या बाबत दिलेल्या सविस्तर हकिगत अशी की, आज दि १ फेब्रुवारी रोजी जामखेड शहरातील संताजी नगर मधील मयत प्रतिक्षा हीस सासरचे लोकांनी गाडी घेण्याकरिता तुझ्या बापाकडून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून व तुला स्वयंपाक भाजी नीट येत नाही. लग्नात हुंडा दिला नाही .असे म्हणून शिवीगाळ ,मारहाण करून तिचा वेळोवेळी मानसिक, शारीरिक छळ ,करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.यानुसार मयत विवाहीता प्रतिक्षा हिचे वडील फिर्यादी अंकुश तुकाराम सगळे, रा. सगळेवाडी ,ता. -पाटोदा, जिल्हा बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
पती- विजय दिलीप चव्हाण,
सासू -सुरेखा दिलीप चव्हाण,
सासरे- दिलीप नामदेव चव्हाण,
दीर -अजय दिलीप चव्हाण,
ननंद -दिपाली निलेश कोल्हे. सर्व राहणार -संताजी नगर जामखेड यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 306 ,498 ,(A)304 (B),34 प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.

मयत विवाहिता प्रतीक्षा हिचे ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here