जामखेड न्युज——
कुसळंब येथील ‘आण्णा ‘ महोत्सवा’चे आयोजन
1 व 2 फेब्रु. 2023 दरम्यान कबड्डी स्पर्धा, रक्तदान आदी सह क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

दरवर्षीप्रमाणे लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित होत असलेल्या यंदाच्या अण्णा महोत्सवा दरम्यान विविध क्रीडा,आरोग्य,सामाजिक,व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असून येथे एक व दोन फेब्रुवारी 2023 रोजी विविध कार्यक्रमांच्या आस्वाद व लाभ घेण्यासाठीची अमळनेर सर्कल सह परिसरातील ग्रामस्थांना उत्सुकता लागून राहिली आहे.

येथील श्री खंडेश्वराच्या पावन भूमीत सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा महोत्सव 2023 दिनांक 1 फेब्रुवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान विविध सामाजिक उपक्रमातून क्रीडा व सांस्कृतिक आरोग्य उपचार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यंदाच अण्णा महोत्सव वर्ष 12 तपपूर्तीचे असुन… अण्णा महोत्सव कुसळंब सह अमळनेर सर्कल मधील तमाम नागरिकांचा सन उत्सव बनलेला असल्याने वेड 2 फेब्रुवारीचे लागुन आहे. यावर्षीच्या नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल – दि.1 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कुलदैवत श्री खंडेश्वर देवस्थान मंदिरात महा अभिषेक होईल. सकाळी साडेनऊ वाजता परिसरातील मुलांच्या उत्कर्षासाठी शालेय कबड्डी स्पर्धा सुरू होतील. दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या नामांकित कबड्डी संघाच्या भागातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. हे सर्व सामने मॅटवर खेळवली जाणार असून डे नाईट होणार आहेत.

दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी नऊ वाजता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील सेमी फायनल व फायनल सामने सुरू होतील. साडेनऊ वाजता आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात येईल. त्याचबरोबर रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. दुपारी 2 वाजता लोकनेते आदरणीय आमदार सुरेश आण्णा धस यांचा अभिष्टचिंतन सोहळा व बक्षीस वितरण समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. रात्री ठीक 8 वाजता महाराष्ट्रातील नामाकित लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील, पुणे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
अण्णा महोत्सवा मधील विविध उपक्रमात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास निमंत्रक माऊली आप्पा जरांगे जिल्हा परिषद सदस्य बीड यांनी व्यक्त केला आहे.



