जामखेड न्युज——
बावी गावात स्मशानभूमीसाठी निधी मिळावा उपसरपंच दादासाहेब मंडलीक यांची खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या कडे मागणी.
देश स्वातंत्र्यापासून बावी गावाला अद्याप स्मशानभूमीच नाही उपसरपंच दादासाहेब मंडलिक
देश स्वातंत्र्याचा ७५ वर्षे कडे अगदी मोठ्या थाटात वाटचाल करत असताना,मात्र नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्या मधील बावी गावात अद्याप स्मशान भूमीच नाही, त्यामुळे उपसरपंच दादासाहेब मंडलिक यांनी खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांच्याकडे स्मशान भूमी साठी निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी केली.
गावची लोकसंख्या १५०० जवळ पास असून गावाला अद्याप स्मशान भूमिच नाही. त्यामुळे नागरिकांचे पण हाल आणि मृत देहाचे हाल होत असतात.
तरी ही मागणी आपल्या लेटर हेड वर खासदार साहेब यांच्या ऑफिसला दिली व अधिकृत ट्विटर हँडलवर आणि मेलवर सुद्धा पाठवले.साहेबांचे स्विय सहाय्यक यांनी काम नक्की मंजूर होईल असे आश्वासन दिले.