जामखेड न्युज——
धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विष्णू चौरे यांचे गंगासागर येथे दर्शन रांगेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे विष्णू भानुदास चौरे (वय ६४) हे दोन धाम करण्यासाठी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर पश्चिम बंगाल येथील गंगासागर येथे दर्शन रांगेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे पाटोदा परिसरात शोककळा पसरली आहे.
विष्णू चौरे हे धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका स्तरीय काम करायचे. अन्यायाविरुद्ध सतत संघर्ष करावयाचे.
त्यांनी २०१५ मध्ये सहा महिने पायी चालत तीन हजार किलोमीटर अंतर पार करत नर्मदा परिक्रमा पुर्ण केली होती.
परिसरात कोठेही रामायण महाभारत असले ते वाचक व अर्थ सांगण्यासाठी अग्रेसर असायचे रामायणाचा अर्थ सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले आहेत मोठा मुलगा बिभीषण व छोटा मुलगा आप्पासाहेब हे औरंगाबाद (संभाजीनगर) येथे नोकरी करतात तर मधला मुलगा पैलवान रमेश हे शेती करतात. तसेच सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी परिसरातील काही जोड्या
गंगासागर येथे दोन धाम यात्रा करायला गेले होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगासागर येथे स्नान करून ते दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने ताबडतोब दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी मृत घोषित केले. मकरसंक्रांतीच्या दिवशीच ही घटना पाटोदा परिसरात कळली व परिसरात शोककळा पसरली. त्यांचा मृतदेह गंगासागर येथून रुग्णवाहिकेने सोमवारी रात्री अकरा वाजता सोनेगाव येथे आला शोकाकुल वातावरणात सोनेगाव येथे अंत्यविधी करण्यात आला.