जामखेड न्युज—–
न्यु इंग्लिश स्कूल राजुरी येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांच्या हस्ते सत्कार
जामखेड पंचायत समिती व विज्ञान गणित संघटना यांच्या वतीने आयोजित जवळा येथील ४७ व्या प्रदर्शनात न्यु इंग्लिश स्कूल राजुरी येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले याबद्दल यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील जिल्हा प्रदर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा. ता.जामखेड या ठिकाणी पार पडलेल्या ४७ व्या जामखेड तालुका विज्ञान प्रदर्शनात न्यु इंग्लिश स्कूल राजुरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता आठवीतील आशिष शिवाजी कोल्हे.(गट 6 ते 8 गणित) विषयात प्रथम आला
त्याप्रमाणेच जामखेड तालुका विज्ञान स्पर्धेतून चि.पियुष बाळासाहेब माने ( इ.6 वी) याचीही निवड झाली. त्या निमित्त विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी विज्ञान व गणित शिक्षक गौतम हुलग॔डे, दिनेश शिंदे यांचाही सत्कार करण्यात.
यावेळी दत्तात्रय राजमाने, श्रीम. सुनिता पिसाळ, दिपक सुरवसे,सुभाष बोराटे, बाबासाहेब समुद्र,
उमराव लटपटे, हनुमान राऊत उपस्थित होते.