जामखेड न्युज——
अडीच वर्षे डांबरावर मुरूम टाकण्याची योजनाच सुरू – आमदार प्रा. राम शिंदे
मतदारसंघात गेले अडीच वर्षे डांबरी रस्त्यावर मुरूम टाकण्यात घालवली आहेत शहराला जोडणारा रस्ता करता आला नाही सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत आमच्या कामाचे नारळ फोडण्यात अडीच वर्षे घातले अशी टिका आमदार प्रा राम शिंदे यांनी केली.
पत्रकार दिनानिमित्त स्नेह संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमातसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, रवी सुरवसे, सलीम बागवान, सोमनाथ पाचारणे, ज्ञानेश्वर झेंडे, प्रा. अरूण वराट, शरद कार्ले, अरूण म्हस्के, धामणगावचे सरपंच महारुद्र महारनवर, कैलास वराट, महादेव वराट, अंकुश ढवळे,अँड बंकट बारवकर, तुषार पवार, गोरख घनवट, मनोज कुलकर्णी, प्रविण सानप, प्रविण चोरडिया,उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की, लोकशाहीत पत्रकारितेला खुप महत्त्व आहे.
त्याला कोणी नाही त्याला पत्रकार आधार देतो.
पत्रकार लोकशाहीला जागेवर ठेवतो.
यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, मी मागच्या दाराने आलो म्हणून टिका होते पण सरकार पुढच्या दाराने आले आहे. राहिलेली विकास कामे मार्गी लावू असेही सांगितले. तसेच गोरगरिबांना उपयोगी पडेल अशी पत्रकारिता करा असा संदेश पत्रकारांना दिला.
यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील तीन वर्षात कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दडपशाही होती. त्यामुळे अनेकांना पक्ष सोडावा लागला ते शरीराने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले मनाने भाजपातच होते.
यावेळी पत्रकार नासीर पठाण, वसंत सानप, सुदाम वराट, बाळासाहेब शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वराट यांनी केले तर आभार शरद कार्ले यांनी मानले.