सरकारने अनुदानाचा टप्पा जाहीर केल्याबद्दल सनराईज शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रा. राम शिंदे यांचा सन्मान

0
246

जामखेड न्युज——

सरकारने अनुदानाचा टप्पा जाहीर केल्याबद्दल सनराईज शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रा. राम शिंदे यांचा सन्मान

अनुदानास पात्र असलेल्या शैक्षणिक संस्थेस सरकारने अनुदान जाहिर केले यामुळे अनेक वर्षे विनापगार काम करणाऱ्या शिक्षकांना पगार सुरू होईल जामखेड तालुक्यातील सनराईज शैक्षणिक संस्थेचे स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेसाठी नव्याने २०% तर कला शाखेसाठी २० मधून ४०% अनुदानास पात्र ठरले म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे, प्राचार्य व प्राध्यापक यांनी सरकारचे व शिक्षणमंत्री यांचे आभार मानत आमदार प्रा. राम शिंदे यांचा सन्मान केला.

जामखेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या पाडळी फाटा जामखेड येथील सनराईज शैक्षणिक संकुलाच्या स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेसाठी नव्याने २०% तर कला शाखेसाठी २० मधून ४०% अनुदानास तालुक्यातील एकमेव ज्युनियर कॉलेज पात्र ठरल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे, प्राचार्या तथा संस्थेच्या सचिव अस्मिता जोगदंड (भोरे) व ज्युनियर कॉलेज चे सर्व शिक्षक यांनी चोंडी येथे मा. आमदार प्रा. राम शिंदे साहेब यांचा महाराष्ट्र शासनाचे व मा. शिक्षण मंत्री दिपक केसरकर साहेब यांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे जीवन सुख समृद्ध केल्या बद्दल त्यांचे कृतज्ञपूर्व आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान केला.

महाराष्ट्र शासनाने नुकताच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिक्षण विभागासाठी ११६० कोटी मंजूर केला आहे आत्तापर्यंत चा हा सर्वात मोठा निधी आहे त्यामुळे शासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे,
प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) मॅडम,संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत हुलगुंडे,तेजस भोरे, प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा.विनोद बहिर,अमोल कसाब, प्रदीप भोंडवे, सागर कदम, स्वाती पवार मॅडम, राजेंद्र काळे सह संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here