जामखेड न्युज——
जामखेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांकडून जेरबंद
लातूर जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हा गेल्या अनेक वर्षांपासून लातूर पोलीसांना चकवा देत जामखेड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलीसांनी संबंधित आरोपीस शोध घेऊन पकडले.
आरोपी आकाश आण्णासाहेब व्होदाडे वय २६ रा. कवठा ता. औसा जि. लातूर असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी आकाश आण्णासाहेब व्होदाडे हा लातूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याबाबत जिल्हाधिकारी लातूर यांनी या आरोपीबाबत एम. पी. डी. ए. ( स्थानबद्धता) प्रस्ताव केला असून तो दिनांक १३ डिसेंबर २०२२रोजी मंजूर झाला होता. तेव्हा पासून संबंधित आरोपी पोलीसांना चकवा देत फरार होता.
याबाबत दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी सदरचा आरोपी जामखेड परिसरात असू शकतो अशी माहिती लातूर एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक यांच्या कडून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती व त्यांच्या पथकास सदर आरोपीस शोध घेण्यासाठी कळवले.
सदरच्या माहितीवरून जामखेड पोलीस स्टेशन शहर हद्दीत पोलीस प्रेट्रोलिंग करत होते यादरम्यान एक इसम संशयितरित्या फिरत असताना दिसला पोलीसांनी त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर यांच्याशी संपर्क साधून खात्री केली त्यानुसार सदर आरोपीने आकाश आण्णासाहेब व्होदाडे असे नाव सांगितले. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता या आरोपी विरोधात लातूर जिल्ह्यातील
एमआयडीसी पोलीस स्टेशन, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, औसा पोलीस स्टेशन, रेणापूर पोलीस स्टेशन, विवेकानंद पोलीस स्टेशन, गांधी चौक पोलीस स्टेशन व बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार या सह विविध मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
संबंधित आरोपीस आज दि. २२ डिसेंबर रोजी पकडण्यात जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्याच्या पथकास यश आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस हेड कॉन्स्टेबल आरसुळ, एन. व्ही शेकडे, एस. डी. दळवी, होमगार्ड भोसले यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे सदर आरोपीस पुढील कारवाई करीता एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर यांच्या ताब्यात दिले आहे.