शिवस्मारकासाठी खर्डा चौकातील जागा आरक्षित करा समस्त शिवप्रेमींची मागणी

0
188

जामखेड न्युज——

शिवस्मारकासाठी खर्डा चौकातील जागा आरक्षित करा

समस्त शिवप्रेमींची मागणी

जामखेड शहरातील खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी जामखेड नगरपरिषद प्रारूप विकास योजनांच्या जमिन वापर नकाशात आरक्षण ठेवावे अशी मागणी शहरातील सर्व पक्षिय शिवप्रेमींनी केली आहे. याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांचेकडे निवेदन देण्यात आले आहे.

प्रारूप विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयीसुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठीची जामखेड नगरपरिषदच्या वतीने दि. २० डिसेंबर २०२२ रोजी जामखेड पंचायत समिती सभागृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली. त्या अनुषंगाने आज दि. २२ डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींनी तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी रितसर निवेदन दिले. सदर निवेदनात म्हटले आहे की, जामखेड नगरपरिषद विकास योनजेचे काम प्रगतीपथावर असून विध्यमान जमिन वापर नकाशा नगरपरिषद कार्यालयास सुपूर्द ( हस्तांतरीत ) करण्यात आलेले आहे.

सध्यास्थितीत प्रारुप विकास योजना तयार करतांना शहराच्या दृष्टीने प्रस्तावित जमिन वापर नकाशात आरक्षणे प्रस्तावित करणे आवश्यक असल्याने तसेच प्रारुप विकास योजनेमध्ये आवश्यक सार्वजनिक सोयीसुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी शहरातील स्थानिक जनतेचा यांचा सहभाग मिळावा या करिता दि. 20/12/2022 रोजी जामखेड नगरपरिषद व सहाय्यक संचालक, नगर रचना अहमदनगर यांचे कडील संयुक्त विद्यमाने आपण बठक आयोजित केलेली होती.

त्यानुसार जामखेड शहरातील खर्डा चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणे करीता खर्डा चौकात जागा (जमीन) आरक्षित करावी हि विनंती. सदर निवेदनावर शेकडो शिवप्रेमिंच्या सह्या असून निवेदनाच्या प्रति अहमदनगर नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक, खा. सुजय (दादा) विखे, आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे यांनाही देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here