जामखेड न्युज——
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाखांचा विमा
तालुक्यातील एकुण ३ हजार १०० शेतक-यांना पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक आपत्ती पुर्वसुचना प्रमाणे १ कोटी ५ लाख ९० हजार ५९५ रुपयांची भरपाई मिळाली आहे. विमा कंपनी आणि कृषि विभागाकडून खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सदर भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक आपत्तीनूसार सदरची नूकसान भरपाई प्राप्त झाली असून, काढणीपश्चात पिकांच्या झालेल्या नूकसानीची भरपाई रक्कम अद्याप कंपनीस्तरावर प्रलंबित आहे याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये तालुक्यातील शेतक-यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये सोयाबीन, तुर, बाजरी, उडीद, कांदा, मुग पिकांची लागवड केलेल्या शेतक-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगामाची सुरुवात झाली असतानाच नैसर्गिक आपत्तीमुळे या सर्व पिकांना मोठा धोका पोहोचला होता. पीके जमीनदोस्त झाल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
तालुक्यातील ३ हजार १०० शेतक-यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. विमा कंपनी आणि कृषि विभाग यांनी केलेल्या पाहाणीतून पीकांचे स्थानिक आपत्तीनूसार झालेल्या नूकसानीच्या प्राप्त झालेल्या वैयक्तिक पुर्वसुचनांच्या अनुषंगाने शेतक-यांना १ कोटी ५ लाख ९० हजार ५९५ रुपयांची पंतप्रधान पिक विमा योजनेची भरपाई जाहीर होऊन शेतक-यांच्या बॅंक खात्यात वर्ग झाली असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.