जामखेड न्युज——
मुख्याधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करून तातडीने बदली करावी – शहर भाजपा
जामखेड नगर परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहणारे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून, दंडवते तातडीने बदली करावी.अशी मागणी जामखेड शहर भाजपाने केली आहे.
भाजपाचे जामखेड शहराध्यक्ष बिभीषण धनवडे आणि नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदार योगेश चंद्रे यांची बुधवारी (ता.३०) भेट घेवून या मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात, तात्याराम पोकळे , सलिम बागवान, डाॅ ज्ञानेश्वर झेंडे, बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, मनोज कुलकर्णी ,डाॅ अल्ताफ शेख, ॲड प्रविण सानप, नितीन धनवडे, गोरख घनवट, आप्पा ढगे, अभिजित राळेभात, डाॅ विठ्ठल राळेभात, अर्जून म्हेत्रे, प्रविण होळकर, योगेश शिंदे, डाॅ नितीन अनभूले, प्रकाश राऊत, राहूल राऊत, शिवकुमार डोंगरे, श्रीराम डोके, विठ्ठल देवकाते, आण्णासाहेब वायसे, महेश मासाळ, सुरेश भोसले, मोहन गडदे , विनोद बोराटे, संतोष गव्हाळे, सलिम तांबोळी, उध्दव हुलगुंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, मिनीनाथ दंडवते हे जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून जुन २०२० पासून कार्यरत आहेत. तेव्हापासून ते शहरात व नगरपरिषदेंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मनमानी कारभार व एकाधिकारशाही पद्धतीने कामकाज करत आहेत. ते नागरिकांच्या कामकाजा संदर्भात भेटीसाठी उपलब्ध नसतात असाही आरोप करण्यात आला आहे. यामध्ये मुख्याधिकारी दंडवते यांच्या कार्यकाळात प्रशासक म्हणून कामकाजावर आक्षेप घेत विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये काळातील सर्व खर्चाची व अदा केलेल्या सर्व बिलांची सखोल चौकशी करण्यात यावी, जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुक प्रक्रिया गुप्त असताना राजकीय दबावाखाली प्रभाग रचना व मतदारयाद्या चुकीच्या पद्धतीने केल्या.
मागील दोन वर्षापासुन दैनंदिन व आठवडे बाजार व्यावसाय कर लिलाव प्रक्रिया झालेली नसून त्याची वसूली मात्र सक्तीने चालू असून त्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्यांचा संशय आहे, जिओ कंपनीच्या शहरात विना परवाना बसवन्यात आलेल्या पोलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे, नगर परिषद अंतर्गत कामामध्ये व टेंडर पद्धती मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे, जागेच्या व घरांच्या नोंदीमध्ये फेरफार करून आर्थिक गैरव्यवहार चालु आहे. , सार्वजनिक शौचालय दुरुस्ती प्रक्रिया मध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे, मोकाट वराह पकडन्याच्या निविदा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये जातीय तनाव निर्माण करण्याच काम केल आहे, अनाधिकृत बांधकामांना शास्ती कर न आकारता नोदी लावण्यात आल्या आहेत, कर्मचारी वर्गावर दबाव टाकुन चुकीचे कामे करून घेण्यात येतात, ज्या कर्मचा-यांनी चुकीचे कामे केले नाही त्यांना निलंबीत केले आहे, नागरिकांना भेटीसाठी वेळ देत भेटत नाहीत व व्यक्ती पाहून काम करतात, लॉकडाउन नियमांचा गैरफायदा घेत कर्मचा-यांमार्फत व्यापा-यांना जाणीव पूर्वक त्रास देऊन चुकीच्या पद्धतीने आर्थिक वसूली केली आहे, शहर विकास आराखड्यामध्ये सर्वेअर यांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे जामखेड नगरपरिषदेचा शहर विकास आराखडा वादाच्या भोवर्यात सापडला आहे. असे प्रश्र उपस्थित करत मुख्याधिकारी दंडवते यांची प्रशासक म्हणून केलेल्या कामाची सखोल चौकशी करून,तडकाफडकी बदली करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.