जामखेड न्युज——
ग्रामीण विद्यार्थी देशपातळीवर चमकतील -तहसीलदार योगेश चंद्रे
जामखेड मध्ये राज्यस्तरीय पाँवरलिफ्टिंग स्पर्धा संपन्न

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्यास ते विद्यार्थी देशपातळीवर आपला नावलौकिक करतील ग्रामीण विद्यार्थ्यांना हि सुवर्ण संधी आहे याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.
महाराष्ट्र पाँवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे अहमदनगर जिल्हा पाँवरलिफ्टिंग स्पर्धा २०२२आयोजित करण्यात आली होती. यात सबज्युनिअर, ज्युनियर, सिनियर, मास्टर स्पर्धांचे उद्घाटन करताना तहसीलदार योगेश चंद्रे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे,शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे गट प्रा. कैलास माने, कॅप्टन लक्ष्मण भोरे, पाँवरलिफ्टिंग जिल्हा प्रमुख दगडू गव्हाळे, इस्माईल सय्यद, डॉ. सचिन काकडे, सेव्हन फिटनेस क्लबचे सुमीत वराट, जयसिंग उगले, नय्युम शेख, अजय भोसले, अरविंद पटेल, सर्फराज पठाण, समीर चंदन यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले की, जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर ग्रामीण विद्यार्थी देशपातळीवर चमकतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित नय्युम शेख यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील व शेतकऱ्यांच्या मुलांना संधी मिळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी रामेश्वर हॉस्पीटलचे संचालक सचिन काकडे म्हणाले की, महाराष्ट्र पाँवरलिफ्टिंग असोसिएशनने मुलांना मोबाईल व इंटरनेट महाजाळातून बाहेर काढून खेळाच्या स्पर्धा भरवल्या यामुळे निश्चित त्यांचा शारीरिक विकास होणार आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू वजन उचलणार आहेत पण इथे प्रत्येकाला जीवनात भार उचलण्याचे काम करावे लागते. तहसीलदार, नेते, पत्रकार, डॉक्टर, सर्व आपापल्या परीने भार उचलत असतात.
यावेळी जिल्हा पाँवरलिफ्टिंग असोसिएशनने अध्यक्ष दगडू गव्हाळे म्हणाले की, जामखेडचे मुले देशात चमकतील नगर जिल्ह्यातील टिम तयार करायची आहे. यामुळे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केले आहे. स्पर्धेसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष सरसमकर यांनी केले.





