जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मुळे वीटभट्टीधारकांना दिलासा
गौण खनिज संदर्भात शासनाने मध्यंतरी एक परिपत्रक काढले होते. यामुळे वीटभट्टीधारकांवर मोठा अन्याय होत होता. ही बाब जामखेड तालुक्यातील दोनशे वीटभट्टीधारक आमदार प्रा. राम शिंदे यांना भेटले व परिपत्रकाविषयी सांगितले तेव्हा आमदार शिंदे यांनी ताबडतोब जिल्हाधिकारी, महसूल सचिव यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा केली तेव्हा परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावला आहे असे निदर्शनास आले. आज दुपारपर्यंत परिपत्रकाचा सविस्तर अर्थ सविस्तर स्पष्ट करण्यात येईल असे सांगितले यामुळे वीटभट्टीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जामखेड तालुक्यातील जवळपास दोनशे वीट भट्टी धारक आहेत गेल्या अनेक दिवसापासून शासनाच्या निर्णयामुळे त्यांचा व्यवसाय बंद झालेला आहे. त्यानिमित्ताने मला आज माझ्या निवासस्थानी चोंडी येथे सर्व वीट भट्टी धारक लोक भेटले. प्रा. राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर राजेंद्र भोसले, जॉईंट सेक्रेटरी महसूल विभाग महाराष्ट्र राजेंद्र चव्हाण व आरडीसी अहमदनगर यांच्याबरोबर कॉन्फरन्सिंग कॉल द्वारे चर्चा केली त्यामुळे शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावला असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे परिपत्रकाचा अर्थ काय आहे हे जॉईन सेक्रेटरी महसूल आज दुपारपर्यंत खुलासा करतील त्यानंतर जामखेड तालुक्यातील वीट भट्टी धारकाचा माती वाहतुकीचा प्रश्न मिटेल त्याचबरोबर जिल्ह्यातील वीट भट्टी धारकांना देखील दिलासा मिळेल. यामुळे वीटभट्टीधारकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला.