जामखेड न्युज——
अल्पावधीतच सागर आष्टेकर यांनी ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला -अमित चिंतामणी
आष्टेकर मोबाईल शाँपी व बजाज फायनान्स तर्फे भव्य लकी ड्राँ संपन्न
अत्यंत कमी कालावधीत सागर आष्टेकरने आष्टेकर मोबाईल शाँपीच्या माध्यमातून मोठा नावलौकीक मिळवला व ग्राहकांचा चांगला विश्वास संपादन केला आहे. दर्जा व गुणवत्ता बाबतीत परिसरात आष्टेकर मोबाईल शाँपीची ओळख निर्माण झाली आहे. असे मत नगरसेवक अमित चिंतामणी यांनी व्यक्त केले.
आष्टेकर मोबाईल शाँपी व बजाज फायनान्स तर्फे दसरा व दिवाळी निमित्ताने १ आँक्टोबर ते ३१ आँक्टोबर या कालावधीत मोबाईल खरेदीदारांसाठी भव्य लकी ड्राँचे आयोजन करण्यात आले होते यांची सोडत आज करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, ज्ञानेश्वर अंदुरे, प्रा. संजय राऊत, आष्टेकर मोबाईल शाँपीचे सागर आष्टेकर, बजाज फायनान्सचे मॅनेजर ऋषभ चव्हाण, किशोर रोकडे, बालाजी गोखले, योगेश सोनवणे, गौरव अंदुरे, अनिकेत झिंझाडे सह पत्रकार वसंत सानप, सुदाम वराट, सत्तार शेख, धनराज पवार यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते.
भव्य लकी ड्राँ सोडत रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी हाॅटेल मैथिली येथे करण्यात आली सुमारे १०६ ग्राहकांनी एका महिन्याच्या कालावधीत बजाज फायनान्स तर्फे मोबाईल खरेदी केले होते. यातील भाग्यवान विजेते काढण्यात आले
प्रथम बक्षीस वाँशिंग मशीन होते एका लहान मुलीच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली भाग्यवान विजेते वैशाली डोळस यांनी चिट्ठी निघाली
द्वितीय बक्षीस विवो मोबाईल -श्रीहरी थोरवे
तिसरे सायकल -अशोक शेळके
चौथे स्मार्ट वाँच -मंगेश कराड
पाचवे एअर बड – क्रांती वनवे
सहावे एअर बड -गणेश चावरे यांचे
बाकी शंभर खरेदी धारकांना हेडफोन बक्षीस देण्यात आले.
यावेळी बोलताना अमित चिंतामणी म्हणाले की, ग्राहकांना दर्जा बरोबर योग्य सेवा दिली म्हणून अगदी कमी कालावधीत सागर आष्टेकर यांनी आपला नावलौकिक मिळवला आहे.
यावेळी बाळासाहेबांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने म्हणाले की, अनेक ठिकाणी लकी ड्राँ मध्ये मोठ्या प्रमाणावर वशिलेबाजी होते पण येथील लकी ड्राँ खुपच पारदर्शक झाला आहे. सागर आष्टेकरने मेहनतीने मोबाईल विक्री व्यवसाय प्रगतीपथावर नेला तसेच सर्व योजना ग्राहकांपर्यंत पोहचवल्या यामुळे परिसरातील ग्राहकांना भरघोस बक्षिसे मिळाली आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय जेधे यांनी केले यांनी केले.