जामखेड न्युज——
पृथ्वीराज गायवळच्या वाढदिवसानिमित्त गो शाळेत चारा दान व दोन गायी दत्तक
गायवळ परिवाराचा अनोखा सामाजिक उपक्रम
समाजसेवक प्रा सचिन सर गायवळ यांचे पुतणे व निलेशभाऊ गायवळ यांचे चिरंजीव पृथ्वीराज निलेश गायवळ यांचा वाढदिवस आज सामाजिक धार्मिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
एका अनोख्या ठीकाणी वाढदिवस साजरा झाल्याने आणखीणच खास होता तो म्हणजे प्रा सचिन गायवळ सरांनी आपल्या पुतण्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साकत येथील पांडुराजे भोसले यांच्या हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या गोशाळेला भेट देऊन गोशाळेत मोठ्या प्रमाणात चारा दान करून धार्मिक बांधिलकीही जपली, गायवळ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस गोशाळेत गाईंना चारा देऊनच साजरा केला जातो ही परंपराच अनेक वर्षापासुन गायवळ कुटुंबायांकडुन सुरू आहे.
आज त्यामध्ये आणखीच भर पडली ती म्हणजे
समाजसेवक सचिन सर गायवळ यांनी गोशाळेतील दोन गाई दत्तक घेऊन आपल्या घरी त्यांच्या पालनाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या गोमातांना आपल्या घरी घेऊन गेले.
हिंदु धर्मामध्ये गोमातेचं महत्व खुप मोठ आहे त्यामुळे गोमाता पालन हे पुण्याच काम वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कडुन होत आहे
जामखेड तालुक्यात मित्रपरीवारांच्या वतीने अनेक ठीकाणी सामाजिक उपक्रम राबवत पृथ्वीराज निलेशभाऊ गायवळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रसंगी सामजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
पुनश्च एकदा पृथ्वीराज निलेशभाऊ गायवळ यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रा. सचिन गायवळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडुराजे भोसले, खंडागळे नाना, युवा नेते तुषार बोथरा यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते