रत्नदीप संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त व संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व स्टाफचा उतरवला विमा रत्नदीप संस्थेच्या सामाजिक बांधिलकी बद्दल समाजात कौतुक

0
155

जामखेड न्युज——

रत्नदीप संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त व संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व स्टाफचा उतरवला विमा

रत्नदीप संस्थेच्या सामाजिक बांधिलकी बद्दल समाजात कौतुक

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनीची, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. भास्करराव व वर्षा मोरे पाटील या दाम्पत्याने पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर ही संस्था गेल्या बावीस वर्षांपासून जामखेड – कर्जत तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवित आहे. या संस्थेच्या रत्नदीप शैक्षणिक संकुलात बीएचएमएस, नर्सिंग व फार्मसी अभ्यासक्रमाचे महाविद्यालय असून राज्यातील विविध जिल्ह्य़ातील जवळपास बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असून त्याअंतर्गत वीस हजारांपर्यंत आरोग्य विषयक उपचार देखिल मोफत केले जाणार आहेत.

‘रत्नदीप’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील हे डाॅक्टर दांम्पत्याच्या मोठ्या कष्टातून तालुक्यातील पहिले वैद्यकीय शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल जामखेडला उभे राहिले. संस्थेची वीस एकर जागेत प्रशस्त आणि भव्यदिव्य देखनी इमारत जामखेड- कर्जत रस्त्यावरुन जाणार्‍या येणाऱ्यांचे लक्ष वेधते. याठिकाणी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम ही राबविले जातात. तसेच विविध सार्वजनिक आपत्ती प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपण्यातही रत्नदीप शैक्षणिक संकुल आघाडीवर असते.

यावर्षी दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून संस्थेने येथे काम करणाऱ्या बीएचएमएस, फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये व मौल्यवान’ भेटवस्तू देऊन अनोख्या पद्धतीने सन्मान केला. त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड केली. रत्नदीप’ शैक्षणिक संकुल ही रत्नदीप फॅमिली असुन येथे सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कौटुंबिक वातावरण मिळत असुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील हे रत्नदीप फॅमिलीचे पालक म्हणून काम करीत आहेत. हे दोघेही पती-पत्नी पालकत्वाच्या भुमिकेत तसूभरही कमी पडत नाहीत याचा सार्थ अभिमान व आनंद येथील कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

चौकट
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेचा वर्धापन दिन व रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी म्हणजे १६ नोव्हेंबर असुन दोन्हीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच या शैक्षणिक संकुलात 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

चौकट
“संस्था अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे पाटील यांनी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर ता.जामखेड या संस्थेच्या माध्यमातून रत्नदीप शैक्षणिक संकुलातील बीएचएमएस,फार्मसी व नर्सिंग महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-
विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकी रूपये एक लाख रक्कमेचा विमा उतरविण्याचा घेतलेला निर्णय हा आमच्या साठी उत्साहवर्धक व भावनिक आहे. त्याबद्दल सर्वं संस्था अध्यक्ष डॉ.भास्करराव मोरे पाटील व सेक्रेटरी डॉ.सौ.वर्षा मोरे यांचे आभार व्यक्त करतो.

प्रा.डॉ.सौ.झेबिया गफ्फार शेख – शरीर रचना विभाग,रत्नदीप होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here