जामखेड न्यूज—-
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानभवनासमोर उड्या मारो आंदोलन -अँड. डॉ. अरूण जाधव
दिपावली पुर्वी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पगार करावा म्हणून १९ तारखेला निवेदन दिले होते पण कर्मचाऱ्यांचा पगार न करता मुख्याधिकारी यांनी अँड अरूण जाधव यांना लेखी दिले होते व जाधव हे कामगार लोकांमध्ये असंतोष निर्माण करतात
असे म्हटले होते. याबाबत जाधव यांनी मी गरीबांसाठी व कामगारांसाठी जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे काहीही झाले तरी मी कामगारांसोबत आहे. मुख्याधिकारी यांच्या पत्रा विरोधात मी जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे. पंधरा दिवसांत मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांच्या वर जर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानभवनासमोर उड्या मारो आंदोलन करणार असे अँड. डॉ. अरूण जाधव यांनी सांगितले.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मिनिनाथ दंडवते नगरपरिषद मुख्याधिकारी जामखेड जि. अहमदनगर यांची तातडीने बदली
करून यांच्या कार्यकाळातील केलेल्या विकास कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करावी.
१) जनेतेच्या पैश्याची अफरातफर,
२)नगरपरिषद वाहनावर बोगस रक्कम खर्च दाखवून मोठ्या प्रमाणात डीझेल, गाड्या दुरुस्तीची बिले दाखवण्यात आली आहेत.
३) जामखेड नगरपरिषद दैनंदिन बाजार वसुली बिगर पावत्यांची करून त्यामधील संपूर्ण रकम मुख्यकार्यकारी अधिकारी कर्मचार्याकडून घेत आहेत.
४) अनाधिकृत बांधकामे व नोंदी लाखोरुपये घेऊन अधिकृत केली आहेत.
५) मनमानी कारभार, वेळेचे भान नाही, प्रशासकांच्या नावाखाली जनतेची पिळूणूक,
या वरील सर्व मुद्याची तातडीने चौकशी करून जामखेड नगरपरिषदेच्या होणाऱ्या आर्थिक
व्यवहाराचा काळाबाजार यांची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्या वरती १५ दिवसामध्ये कारवाई करण्यात यावी अन्यथा नोव्हेंबर अखेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधान भवना समोर उड्या मारो आंदोलन करणार यांच्या होणाऱ्या परिणामास जबाबदार महाराष्ट्र शासन असणार याची जाणीव असावी.
आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जामखेड जि. अहमदनगर येथील जनतेला
न्याय द्यावा हि नम्र विनंती. अँड अरूण जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.अँड अरूण जाधव यांच्या आंदोलनामुळे जामखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.