कठ्ड्यावीना शेकडो अपघातात अनेकांचा जीव गमावलेल्या पोखरी पुलावर जामखेडचे उद्योजक आकाश बाफनातर्फे लोखंडी कठडे बसवण्यास सुरूवात स्पीड ब्रेकरही टाकणार

0
248

जामखेड न्युज——

कठ्ड्यावीना शेकडो अपघातात अनेकांचा जीव गमावलेल्या पोखरी पुलावर जामखेडचे उद्योजक आकाश बाफनातर्फे लोखंडी कठडे बसवण्यास सुरूवात स्पीड ब्रेकरही टाकणार

जामखेड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नगर-जामखेड महामार्गावर बीड जिल्हा हद्दीत असलेल्या पोखरीपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या अपघात प्रवण क्षेत्रातील पुलाला कठडे नसल्याने या ठिकाणी शेकडो अपघात झाल्याने अनेकांची जीव गेले आहेत. तर अनेक जण कायमचे अपंग झाल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अपघात रोखण्यासाठी बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना पुढे आले आहेत ते पदरमोड करून पुलावर लोखंडी कठडे बसवणार व स्पीड ब्रेकर टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

पोखरी येथील पुलावरील बॅरिगेटिंग कामाला सुरुवात केली यावेळी बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना, दिगंबर राऊत, बाळासाहेब नवसार, अशोक कुमटकर सह
इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

कठडे नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे मात्र याकडे बांधकाम विभागाचे पुर्णतः दुर्लक्ष आहे. याबाबत दोनच दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जामखेड येथील प्रसिध्द व्यापारी महेंद्र बोरा यांचा याच पुलाखाली गाडी जाऊन झालेल्या अपघातात त्यांचा जीव गेला तर घरातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या पुलाकडे कोणी लक्ष देत नसल्याने जामखेड येथील बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना यांनी पुढाकार घेत बाफना उद्योग समूहाच्या वतीने आकाश बाफना हे पुलावर लोखंडी कठडे व स्पीड ब्रेकर टाकणार असलेल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी दिली होती आज प्रत्येक्षात कामाला सुरुवात झाली आहे.

जामखेड नगर राष्ट्रीय महामार्गावरील कठडे नसलेल्या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असून हा पूल जीवघेणा ठरत आहे. हा पूल वळण रस्त्यावर असून या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा गतिरोधक नाहीत पुलावर झाडे जास्त वाढलेली आहेत. रस्ता पुर्ण झाकुन जात आहे. रस्ता दिसत नसल्याने तसेच साईट पट्टया भरलेल्या नसल्याने मोठे अपघात होतात अनेक वाहने भरधाव जातात व अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

वाहतुकीच्या सोयीसाठी नदी, नाल्यांवर पूल बांधण्यात येतात. सुरक्षेसाठी कठडेही लावण्यात येतात. मात्र, महामार्गावरील पोखरी जवळील पूल कठड्यांविना आहे. वाहनधारकांचा या पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मात्र येथे कठडे
पुढाकार मात्र कुणीही घेत नसल्याने प्रश्न कायम होता. त्यामुळे बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना यांनी कठडे बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे बाफना यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महामार्गावर प्रचंड चढ उतार, मार्गाचे काम करताना न भरलेले साइड पट्ट्या वळणावर वाढलेली झाडेझुडपे, झाकले गेलेले सूचना फलक यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. या पुलावर आजुबाजूने कुठलेही संरक्षण नसल्याने चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ पुलावरून कोसळल्याची घटना दि. २ नोव्हेंबर रोजी घडली. यात जामखेड शहरातील व्यापारी महेंद्र बोरा यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही अनेक मोठे अपघात या झाले असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावर कुठेच फलक लावलेले दिसत नाहीत.

उद्योजक आकाश बाफना यांचा पुढाकारातून लोखंडी कठडे व स्पीड ब्रेकर बसवण्याच्या कामाला सुरुवात

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बाफना उद्योग समूहाचे चेअरमन आकाश बाफना हे अपघात रोखण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी सामाजिक दृष्टीकोनातून मृत्यूचा सापळा बनलेल्या पुलावर लोखंडी कठडे व स्पीड ब्रेकर बसवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे अपघात टळतील व अनेकांचा जीव वाचणार आहे. या सामाजिक कार्यामुळे बाफना यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here