जामखेड न्यूज—–
रस्त्याच्या भांडणातून मारामारी परस्पर विरोधी दहा
जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथे शेतातून सार्वजनिक रस्ता करण्याचे सांगितल्याच्या कारणावरून सहा जणांकडून फिर्यादीसह चार जणांस लोखंडी पाइप व दगडाने मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. परस्पर विरोधी दाखल फिर्यादी मध्ये एकुण दहा जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथे ग्रामपंचायतला आमचे रानात रस्ता करायचा का सांगितला असे म्हणून यातील फिर्यादी शिवाजी दगडू डोळे, वय-41 राहणार डोळेवाडी यांना त्यांचे राहते घरासमोर येऊन यातील आरोपी वैजनाथ सदाशिव डोळे, भरत दिलीप डोळे, कृष्णा महादेव डोळे, सदाशिव राऊसाहेब डोळे, काशीबाई सदाशिव डोळे, सुमन महादेव डोळे सर्व राहणार डोळेवाडी ता. जामखेड

यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे शिवाजी दगडू डोळे यांना तू ग्रामपंचायतला आमचे रानात रस्ता करायचा का सांगितला असे म्हणून भरत दिलीप डोळे यांने त्याचे हातातील लोखंडी पाइपने व उजवे पायाचे मांडीवर व पाठीवर मारहाण केली व त्यावेळी फिर्यादीची पत्नी ही फिर्यादीत सोडायला आली असता तिला आरोपी वैजनाथ सदाशिव डोळे याने त्याचे हातातील दगड हातात धरून फिर्यादीची पत्नी कांताबाई हिचे उजवे हाताचे दंडावर मारला त्यावेळी फिर्यदीचा भाऊ केशव व भावजय मीना हे भांडणे सोडायला आले असता. आरोपी क्रमांक 3. कृष्णा महादेव डोळे आरोपी क्रमांक 4. सदाशिव राऊसाहेब डोळे यांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून घाण घाण शिवीगाळ केली व आमचे रानात रस्ता केला तर तुमचा कायमचा काटा काढू अशी धमकी आम्हाला दिली आहे.

त्यावेळी तेथे काशीबाई सदाशिव डोळे, सुमन महादेव डोळे यांनी येऊन फिर्यादी व साक्षीदार घाण घाण शिवीगाळ केली आहे म्हणून यातील सहा ही आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून यातील फिर्यादी व साक्षीदार यांना लोखंडी पाईप व दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून कायमचा काटा काढू अशी धमकी दिली आहे.

याबाबत शिवाजी दगडू डोळे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वि. कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही घटना दि. ३० आँक्टोबर रोजी रात्री ८: ०० वाजेच्या सूमारास घडली आहे. शिवाजी दगडू डोळे यांचे राहते घरासमोर घडली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे करीत आहेत.



