जामखेड न्युज——
मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटलसाठी मदत करणार -आमदार निलेश लंके
बापुसाहेब तांबे सह शिक्षक बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान
गावाच्या सन्मानाला विशेष महत्त्व-बापुसाहेब तांबे
विकास मंडळाच्या जागेवर होणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हाँस्पीटलसाठी मी व दादा सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल गावांने केलेला सत्कार हा अभिमानास्पद असून यातूनच मिळालेल्या प्रोत्साहनाच्या उर्जेतून पुढील काळात राजकारण बाजूला ठेवून सर्व संघटना, सभासदांना बरोबर घेऊन बँकेत व विकास मंडळात चांगले कामे करायची आहेत आज केलेला सन्मान हा गावाच्या मातीचा असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. असे प्रतिपादन गुरुमाऊली मंडळ २०१५ चे सर्वेसर्वा बापुसाहेब तांबे यांनी केले .
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत गुरुमाऊली मंडळ २०१५, ऐक्य मंडळ, शिक्षक भरती, एकल मंच या आघाडीच्या विजयाचे शिल्पकार जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या गोरेगाव येथील मातृभूमी आ. निलेशजी लंके, जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या सत्कारस उत्तर देताना तांबे बोलत होते.
यावेळी गुरूमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, साहेबराव अनाप, गोकुळ कळमकर, विद्युलता आढाव, अंजली मुळे, वनिता सुंभे, तांबे मॅडम, बाळासाहेब कदम, राजेंद्र सदगीर, शरद सुद्रीक, सुयोग पवार, मनोजकुमार सोनवणे, एकलमंच, शिक्षक भारती, ऐक्य मंडळ व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत बापूसाहेब तांबे यांचा सपत्नीक नागरी सन्मान करण्यात आला. याबरोबरच बँकेचे जामखेड येथील नवनिर्वाचित संचालक संतोषकुमार राऊत, विकास मंडळ विश्वस्त मुकुंदराज सातपुते, राज्य नेते केशव गायकवाड, जिल्हा नेते विकास बगाडे, माजीद शेख, जामखेड तालुका उच्चाधिकारर समिती अध्यक्ष जालिंदर भोगल, प्राथमिक शिक्षक संघ जामखेड तालुका अध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण प्रसिद्धीप्रमुख राजीव मडके, उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, तसेच बँकेचे उपस्थित सर्व संचालक विश्वस्त यांचा नागरी सत्कारही यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर गुरु माऊली मंडळ आघाडीची सर्वच नेतेगण,महिला आघाडी आणि मा.14 संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन या सर्वांचा नागरी सन्मान करण्यात आला.
यावेळी गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मी हा विजय बापूसाहेब तांबे यांच्या वडीलांना समर्पीत करतो. साहेबराव अनाप यांनी बापूसाहेब सर्वसामान्य शिक्षकांची नेते असल्याची भावना व्यक्त केली ऐक्य मंडळ नेते बाळासाहेब कदम यांनी बापूसाहेब कार्याचे गौरव केला प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळची कळमकर यांनी बापूसाहेब आणि यांची मैत्री गोरेगावची पवित्र भूमी याचा आपल्या भाषणात उल्लेख केला जामखेड तालुका अध्यक्ष एकनाथ (दादा)चव्हाण यांनी आम्ही हे निवडणूक बापू साहेबांच्या नेतृत्वाखाली टीम बापू म्हणून संघ भावना भक्कम ठेवून लढवल्याचे सांगितले. यावेळी जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, साहेबराव अनाप यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाची सूत्रसंचलन प्रकाश नागरे व अनिल शिंदे यांनी आपल्या कौशल्यपूर्ण शैलीत केले.