पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्यासह आठ जणांनवर खुनाचा प्रयत्न करणे हे वाढीव कलम लागले या पुर्वी आठ जणांनवर दाखल होता खंडणीचा गुन्हा दाखल!!

0
311

 

  • जामखेड न्युज——

  • पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्यासह आठ जणांनवर खुनाचा प्रयत्न करणे हे वाढीव कलम लागले

  • या पुर्वी आठ जणांनवर दाखल होता खंडणीचा गुन्हा दाखल

अंदुरे कुटूंबियांना खांडणी मागीतली या कारणावरून जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्या सह एकुण आठ जणांवर गुन्हा दाखल दाखल झाला होता. यानंतर याबाबत जखमींच्या मेडिकल अहवाला नुसार पुन्हा या गुन्ह्य़ात खुनाचा प्रयत्न करणे हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत .

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी कुटूंबाला सातत्याने धमकावणे व मारहाण केल्याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला आठ जणांविरोधात कलम 387 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापतींचा समावेश आहे. या प्रकरणामुळे राजकिय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.

जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी कुटूंब असलेल्या अंदुरे कुटूंबाचे जामखेड शहरात शितल कलेक्शन, शितल ट्रेडर्स, शितल सुपर मार्केट, मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 1 जून्या बस स्टॅण्ड समोर, जामखेड व मे. रावसाहेब बाबुराव अंदुरे भांड्याचे दुकान शाखा नं. 2 जूना कोर्ट रोड, जामखेड अशी पाच दुकाने आहे. या कुटुंबाकडे जामखेड पंचायत समितीचे सदस्य तथा भाजपचे वजनदार नेते डाॅ भगवान मुरुमकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी 50 लाखांची मागणी केली होती. या पैश्यांच्या मागणीसाठी अंदुरे कुटुंबातील सदस्यांना सातत्याने मारहाण आणि दमबाजी करण्यात आली होती.

या घटनेतील फीर्यादी च्या दोन नातेवाईक या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. त्या मुळे त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यानंतर याबाबत जखमींच्या मेडिकल अहवाला नुसार पुन्हा या गुन्ह्य़ात खुनाचा प्रयत्न करणे हे वाढीव कलम लावण्यात आले आहे आशी माहिती जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी दिली आहे.

त्यामुळे आता सागर अंदुरे यांच्या फिर्यादीवरून पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरुमकर रा. साकत ता. जामखेड, यांच्या सह एकुण आठ जणांविरोधात कलम 387 अन्वये सह खुनाचा प्रयत्न करणे (307),व (326) हे वाढीव कलमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here