Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या एवढीच खुमखुमी असेल तर रोहित पवारांनी राजीनामा द्यावा मीही तयार- आमदार प्रा....

एवढीच खुमखुमी असेल तर रोहित पवारांनी राजीनामा द्यावा मीही तयार- आमदार प्रा. राम शिंदे धनशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र विकत घेऊ पाहणाऱ्यांला धडा शिकवू – मंत्री तानाजी सावंत

0
216

जामखेड न्युज——

एवढीच खुमखुमी असेल तर रोहित पवारांनी राजीनामा द्यावा मीही तयार- आमदार प्रा. राम शिंदे

धनशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र विकत घेऊ पाहणाऱ्यांला धडा शिकवू – मंत्री तानाजी सावंत

मी विधानपरिषदेचा आमदार आहे. मी राजीनामा देऊन निवडणूक लागत नाही. निवडणूकीची आमदार रोहित पवारांना जर निवडणूकीची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी आगोदर राजीनामा द्यावा मीही तयार आहे असे भुरटे आव्हान देऊ नये होऊन जाऊ द्या कर्जत जामखेड जनतेच्या मनात काय आहे. असे आमदार प्रा राम शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ते की रोहित पवार नेहमी म्हणतात मी मागच्या दाराने आलो आहे शरद पवार देखील मागच्याच दाराने गेल्या पंधरा वर्षांपासून जात आहेत. म्हणजे ते पवार साहेबांविषयी बोलत आहेत.

यावेळी तानाजी सावंतांनीही पवारांचा समाचार घेतला यावेळी बोलताना मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, “येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठे मोठे झाडू घेऊन आपल्याला कर्जत-जामखेड हा मतदारसंघ साफ करायचा आहे, एका ठिकाणी जनशक्ती आहे, तर एका ठिकाणी धनशक्ती आहे, त्यांना वाटतं की धनशक्तीच्या जोरावर, पुर्ण महाराष्ट्र विकत घेऊन, अमेरिकेला जगायला जावू, आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला सर्वसामान्य जनतेसाठी काम करत रहायचं आहे, ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही आहोत, असे सावंत म्हणाले.

आपलं व्रत प्राध्यापकाचं आहे, शिक्षकाचं आहे, लोक जागृतीचं आहे, आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं आहे, तेच व्रत सरांचं आणि माझं आहे. आजपर्यंत बलाढ्य शक्तींशी तानाजी सावंत एकटा लढत होता, आता राम शिंदे आणि नारायण आबांसारखी मंडळी माझ्या बरोबर असल्यामुळं इथून पुढं मी बिनधास्त आहे. तुम्ही कुठलही काम सांगा त्या ठिकाणी पहिला वार छातीवर झेलणारा हा तानाजी सावंत असेल असे वचन देत मंत्री तानाजी सावंत यांनी पवार कुटुंबाचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला

आमदार प्रा राम शिंदे यांनी त्यांच्या चौंडी येथील निवासस्थानी दिपावली निमित्ताने फराळाचे आयोजन केले होते यासाठी विद्यमान मंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार यांच्या सह कर्जत जामखेड दोन्ही तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आमदार शिंदे मंत्री असताना जशी गर्दी होत होती तशीच गर्दी आज पुन्हा दिसून आली.

एका किसान मोर्चा च्या कार्यकत्याची नोकरी महाविकास आघाडी सरकारने घालवली होती ती नोकरी परत मंत्री तानाजी सावंतांनी मिळवून दिली याबद्दल मंत्री सावंतांचे आमदार प्रा राम शिंदे यांनी विशेष स्वागत केले.

प्रा. राम शिंदे राज्याचे मंत्री असताना नेहमी कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणारी चोंडी मागील काही वर्षे गर्दी विना होती, परंतू यंदा कार्यकर्त्यांच्या गर्दीने चोंडी पुन्हा एकदा फुलून गेली होती. यंदा गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले.

 

आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजीत दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, तसेच जिल्ह्यातील व कर्जत जामखेड सह आष्टी पाटोदा, करमाळा, भुम, परांडा येथील
अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!