Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आमदार प्रा. राम शिंदे यांच्या दिवाळी फराळासाठी आजी माजी मंत्री खासदार, आमदारांसह...

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या दिवाळी फराळासाठी आजी माजी मंत्री खासदार, आमदारांसह मोठ्या गर्दीत संपन्न!! महाविकास आघाडी सरकारने घालवलेली एका कार्यकत्याची नोकरी मंत्री सावंतांनी केली पूर्ववत!!

0
267

जामखेड न्युज——

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या दिवाळी फराळासाठी आजी माजी मंत्री खासदार, आमदारांसह मोठ्या गर्दीत संपन्न!!

महाविकास आघाडी सरकारने घालवलेली एका कार्यकत्याची नोकरी मंत्री सावंतांनी केली पूर्ववत!!

आमदार प्रा राम शिंदे यांनी आज त्यांच्या चौंडी येथील निवासस्थानी दिपावली निमित्ताने फराळाचे आयोजन केले होते यासाठी विद्यमान मंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदार यांच्या सह कर्जत जामखेड दोन्ही तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आमदार शिंदे मंत्री असताना जशी गर्दी होत होती तशीच गर्दी आज पुन्हा दिसून आली.

एका किसान मोर्चा च्या कार्यकत्याची नोकरी महाविकास आघाडी सरकारने घालवली होती ती नोकरी परत मंत्री तानाजी सावंतांनी मिळवून दिली याबद्दल मंत्री सावंतांचे आमदार प्रा राम शिंदे यांनी विशेष स्वागत केले.

प्रा. राम शिंदे राज्याचे मंत्री असताना नेहमी कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलणारी चोंडी मागील काही वर्षे गर्दी विना होती, परंतू यंदा कार्यकर्त्यांच्या गर्दीने चोंडी पुन्हा एकदा फुलून गेली होती. यंदा गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले.

आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चोंडी
कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दुरावलेले अनेक कार्यकर्ते तसेच शिंदे समर्थक आमदार राम शिंदे यांच्या भेटीसाठी चोंडीत दाखल झाले होते. राम शिंदे यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांसह सामान्य माणसांनी केलेली मोठी गर्दी लक्षवेधी ठरली.

दिवसभर आमदार राम शिंदे यांचा बंगला नागरिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी केलेली मोठी गर्दी आता चर्चेचा विषय बनली आहे. आमदार राम शिंदे यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाल्याचेच संकेत आजच्या कार्यक्रमाने दिले आहेत. दिवाळी फराळासाठी आलेल्या प्रत्येक लहान – सहान कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यांचे स्वत: राम शिंदे हे स्वागत करत होते. ते सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी करत संवाद साधत होते. राम शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची चढाओढ लागली होती.

आमदार राम शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजीत दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, तसेच जिल्ह्यातील व कर्जत जामखेड सह आष्टी पाटोदा, करमाळा, भुम, परांडा येथील
अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती.

 

आज पार पडलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली. सर्वांनी दिवाळी
फराळाचा आस्वाद घेतला. दिवाळी फराळासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!