जामखेड न्युज——
अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट
अवैध धंदे बंद करावेत ग्रामस्थांचे तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन
जामखेड तालुक्यातील चौंडी हे गाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव आहे. संपूर्ण देशात अहिल्यादेवी होळकरांचे काम आदर्श आहे. चौंडी हे सध्या पर्यटन स्थळ आहे पण याच गावात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. ते ताबडतोब बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन द्वारे केली आहे.
तहसीलदार कार्यालय व पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या निवेदनावर सुनील उबाळे, विजय भांडवलकर, शरद शिंदे, दादा सोनवणे , संकेत देवकर ,दीपक मोरे, विनोद साठे, काळू सोनवणे यांच्या सह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

चोंडी गाव हे पर्यटनस्थळ असल्या कारणाने येथे रोज पर्यटकांची वर्दळ असते, गावच्या प्रवेशद्वारावरच चिकनचे दुकान टाकले पण त्यामधूनच अवैध्य दारू विक्री केली जाते. अनेकदा तेथील दारू पिणाऱ्या व्यक्तींनी पर्यटकांशी हुज्जत घातलेली आहे. त्या व्यक्तीला सांगायला गेले तर दम देतात दांडगायची भाषा करतात.
ग्रामपंचायतला सांगितले तरी काही निष्पन्न होत नाही मग ग्रामस्थांनी कोणाकडे न्याय मागायचा तर मग आम्ही आपणाला निवेदन देऊन आपण त्यावरती कार्यवाही कराल हीच माफक आशा..! दुसरा एक दारूचा गुत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चौंडी व अण्णासाहेब डांगे यांची आश्रमशाळा या दोन्ही शाळा पासून 100 मीटर च्या आत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

त्याला पण सांगितले पण काही ऐकत नाही. शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांवरती वाईट परिणाम होत आहेत. या सर्व कारणांमुळे आम्ही गावकरी आपणास नम्र विनंती करत आहोत आपण यात काळजीने लक्ष घालावे व गावतील आई, बहीण यांचे संसार दारूने जे उध्वस्त होण्यापासून वाचावेत हीच अपेक्षा.
अजूनही गावात अवैध दारूचे गुत्ते आहेत ते पण यांवर ही कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.










