जामखेड न्युज——
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे साकत परिसरात पंचनामे सुरू!!!
घाटमाथ्यावर साकत परिसरात अतिवृष्टीने सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार रोहित पवारांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार आज साकत परिसरात सकाळी सकाळीच पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.
साकत येथे अनेक ठिकाणी पीके पाण्यात आहेत याचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले यावेळी सरपंच हनुमंत पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर, कृषीच्या राणी चव्हाण, शेतकरी सतिश लहाने, गणेश लहाने, सुरेश लहाने हजर होते.
साकत परिसरात अतिवृष्टीने सोयाबीन पीक पाण्यात आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांनी पीक विमे उतरवले आहेत ७२ तासात विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे पण आँनलाईन कळविण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. लोकांना काही कळत नाही त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती यानुसार आज साकत परिसरात पंचनामे करावेत असे सांगितले होते. यानुसार पंचनामे सुरू झाले आहेत. सकाळी आठ वाजताच पंचनामे सुरू झाले आहेत.
साकत परिसरातील मुख्य पीक सोयाबीन आहे सोयाबीन पाण्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कणाच मोडला आहे.
कधी सोयाबीन काढायचे व कधी रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची पेरणी करायची असे मोठे संकट उभे आहे.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावेत यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी केले आहे.