शिक्षिकेची आत्महत्या, जामखेड पोलीस स्टेशनला शिक्षक दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

0
344

जामखेड न्युज——

शिक्षिकेची आत्महत्या, जामखेड पोलीस स्टेशनला शिक्षक दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

शिक्षक पती व पत्नीने लग्नास विरोध केला व उसने दिलेले पाच लाख रुपये देण्यास नकार देऊन मानसिक त्रास दिल्याने शिक्षिकेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत शिक्षिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक पतीसह तिच्या पत्नी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महतेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिक्षक आरोपी परमेश्वर धर्माची बोडखे व त्याची पत्नी मालुबाई परमेश्वर बोडखे रा रा. सावरगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड ( हल्ली रा शिक्षक कॉलनी जामखेड. जिल्हा अहमदनगर) आशी आरोपींची नावे आहेत.

मयत शिक्षिकेच्या आईने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझी मुलगी संतुकाबाई वाघोजी भिसे वय ३४ ही अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील एका माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. तीचे लग्न १२ वर्षा पुर्वीच नांदेड जिल्ह्य़ातील एका मुला सोबत झाला होता. त्यांना दोन मुले देखील झाली आहेत. मात्र चार वर्षापासून माझी शिक्षिका मुलगी सुंतुकाबाई हीचे आपल्या पती सोबत पटत नसल्याने ती वेगळी रहात होती.

यानंतर मयत शिक्षिकेची आरोपि शिक्षक असलेल्या परमेश्वर बोडखे यांच्या सोबत जुनी ओळख होती व या ओळखीतुन त्यांचे प्रेम जुळले. सदर आरोपी शिक्षक हा जामखेड शेजारील पाटोदा तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरी करत होता. त्यामुळे तो सध्या जामखेड शहरातील शिक्षक कॉलनी या ठीकाणी रहात होता. त्यामुळे मयत शिक्षिका ही आरोपी शिक्षक हे एकमेकांना भेटत असत. तसेच ते दोघे लग्न देखील करणार होते. तसेच मागिल चार महिन्यांपासून ते कोपरगाव या ठीकाणी एकत्र रहात होते.

या नंतर या दोघांचे प्रेमप्रकरण शिक्षक आसलेल्या पत्नीला माहीत झाले त्यामुळे त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे शिक्षक परमेश्वर बोडखे हा पुन्हा जामखेड येथिल आपल्या घरी रहायला आला. दि ९/७/२०२२ रोजी मयत शिक्षिका संतुकाबाई ही जामखेड येथिल शिक्षक प्रियकराच्या घरी आली यावेळी तीने विष घेतले होते त्यामुळे आरोपी यांनी तीला जामखेड येथिल एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बाबत ची माहीती तीची फीर्यादी आई हीस कळवल्या नंतर तीने विष प्राशन केलेल्या आपल्या मुलीस नांदेड येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. तीला बरे वाटत असल्याने तीला घरी सोडण्यात आले मात्र एक महीन्या नंतर पुन्हा तीला त्रास होऊ लागल्याने पुन्हा नांदेड येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आखेर तीचा दि ९/९/२०२२ रोजी तीचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संबंधित आरोपी शिक्षक पती व पत्नीने माझ्या मुलीच्या लग्नास विरोध केला. तसेच माझ्या मुलीने त्यांना दिलेले उसने 5 लाख रुपये देण्यास नकार दिला व मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या नेहमीच्या मानसिक त्रासाला कंटाळून यातील मयत माझी मुलगी शिक्षिका संतुकाबाई हिने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची फीर्याद दिली होती. त्याच अनुषंगाने दि १८ ॲक्टोबर २०२२ रोजी संबंधित आरोपी शिक्षक पती व पत्नी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here