जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांच्या तर्फे राजुरी परिसरातील ऊसतोड मजुरांना आवश्यक साहित्याचे वाटप होणार

सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांच्या माध्यमातून गावात लोकांना बसण्यासाठी बाकडे, गाव व वाड्यात एलईडी लॅम्प, गावात मुरमीकरण, शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इंग्रजी पुस्तके आणि आता राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी परिसरातील ऊसतोड मजुरांना आवश्यक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तरी गरजू ऊसतोड मजुरांनी लाभ घ्यावा असे आवाहन सागर कोल्हे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व अत्यावश्यक साहित्याचे वाटप रविवार दि 16 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या गावचे सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेरमन, पोलिस पाटील,व्हाईस चेरमन, उपसरपंच, सोसायटीचे सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते होईल

आतापर्यंत सागर कोल्हे यांनी गावात सततच्या पावसामुळे गावात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता याचा त्रास शाळकरी मुले व ग्रामस्थांना सहन करावा लागत होता नीट चालता येत नव्हते. ही अडचण ओळखून गावातील सामाजिक कार्यकर्ते सागर कोल्हे यांनी पदरमोड करून गावात चाळीस ट्रॅक्टर मुरुम टाकला यामुळे ग्रामस्थ व शाळकरी मुलांची चिखलापासून सुटका झाली आहे. ग्रामस्थ व शाळकरी मुलांनी सागर कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

वाढदिवसानिमित्त त्यांनी राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त पुस्तके दिली तसेच गावातील अंधाराचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पंचवीस एलईडी लॅम्प बसविले यामुळे गाव प्रकाशमान झाले.
सागर कोल्हे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. कार्यसम्राट आमदार मा रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी येथे नदीखोलीकरन च्या कामात महत्वाची भूमिका घेऊन 1 km नदीचे खोलीकरण केले आहे. यामुळे राजुरी गावात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.
तसेच राजुरी डोळेवाडी येथे बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून स्वखर्चाने 40 बाकडे बसवले आहेत,,110 LED लॅम्प बसवले आहेत. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते यात अनेकांनी आपली कला सादर केली.
तसेच परिसरातील सैन्यात भरती झालेल्या आर्मीतील जवानांचा सत्कार केला व रोख बक्षीस दिले.
राजुरी ,डोळेवाडी, एकबुर्जी मधील 80 टक्के जनतेची मागणी आहे असा सामाजिक कार्यकर्ता बिनविरोध सरपंच करावा
येणाऱ्या काळात राजुरी गाव तालुक्यातील एक आदर्श गाव निर्माण केले जाईल. असेही कोल्हे यांनी सांगितले.









