जामखेड न्युज——
सभासद शिक्षकांना सर्वांगीण विकासाची खात्री- निवडून येणार छत्री – एकनाथ (दादा) चव्हाण

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक सभासदांनीच हातात घेतली असून गुरूमाऊली मंडळ 2015 तांबे गटास जामखेड तालुक्यातील सभासदांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहाता प्राथमिक शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाची खात्री, निवडून येणार छत्री असे प्रतिपादन जामखेड तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष एकनाथ (दादा) चव्हाण यांनी केले आहे.

गुरुमाऊली मंडळ 2015 तांबे गटाच्या शिक्षक बॅंक व विकास मंडळ उमेदवारांच्या प्रचारार्थ नायगाव-खर्डा-तेलंगशी या भागाचा झंझावाती प्रचार दौरा करून गुरुमाऊली मंडळाच्या प्रचारार्थ असलेल्या दोन्ही टीम सिताराम गडाच्या पायथ्याशी एकत्र आल्यानंतर या ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षक सभासदांचा उदंड प्रतिसाद लाभला. जिल्ह्याचे जिल्हा श्रेष्ठी केशव (तात्या) गायकवाड, विकास मंडळाचे उमेदवार मुकुंदराज सातपुते, युवा नेतृत्व रुपेश वाणी, नानासाहेब मोरे, जिल्हा नेते संतोष डमाळे, श्रीहरी साबळे, शहाजी जगताप, नानासाहेब मोरे, अनिलकुमार भोसले, अर्जुन पवार, भाऊसाहेब डिडूळ यांनी खर्डा भागात प्रचाराची रणधुमाळी उडवली. श्री क्षेत्र सिताराम गडाच्या पावनभूमी असलेल्या खर्डा-तेलंगशी-नायगाव भागातील शिक्षक सभासदांचा सर्व जनसमुदाय जमला आणि यावेळी सर्व सभासदांनी ग्वाही दिली की, आम्ही गुरुमाऊली मंडळ 2015 चे बापूसाहेब तांबे यांच्या बँक व विकास मंडळाच्या विकासाच्या मुद्द्यावर खंबीरपणे पाठीशी उभे असून. गुरुमाऊली मंडळ 2015 ला भरघोस मतांनी निवडून देणार आहोत.
यावेळी धीरज उदमले प्रकाश गाडेकर ज्ञानेश्वर कौले, बापूसाहेब कोळी, शिक्षक भारतीचे नेते सुरेश सरगर, रमेश दराडे, बबन बारगजे यांनी केले.यावेळी शरद पाचरणे, बाबुराव गीते, रवीराज पवार, व्यंकटेश कुलकर्णी, अंबादास गाडे, अंकुश महानवर, नितीन पवार संतोष गोरे, नितेश महारनवर, शिवाजी घोडके, सतीश बोरुडे, महादेव घाटेवाळ, नागनाथ बुडगे, जीवनराव जंबे, जालिंदर चिलगर यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.




