लबाड लांडग ढोंग करतय सत्तेत येण्याचं ढोंग करतय – आबासाहेब जगताप सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीचा मेळावा मोठ्या गर्दीत संपन्न

0
203

 

जामखेड न्युज——

लबाड लांडग ढोंग करतय सत्तेत येण्याचं ढोंग करतय – आबासाहेब जगताप

सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीचा मेळावा मोठ्या गर्दीत संपन्न

मुलां- मुलींच्या लग्नात सानुग्रह अनुदान म्हणून चेक देण्याची योजना फक्त नातलगांसाठी वापरली सामान्य सभासदांना त्याचा फायदा झाला नाही त्यांचे चेक वटले नाहीत. अशा खोट्या योजना बँकेतर्फे राबवितांना सत्ताधारी नेत्यांचे डोके ठिकाणावर होते का❓ आणी परत आता सत्तेत येण्याचं स्वप्न पाहात आहेत. सदिच्छा मंडळ त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवील व सभासदांच्या विश्वासावर पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास राज्याचे शिक्षक नेते आबासाहेब जगताप यांनी व्यक्त केला.

जामखेड येथे सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडी जामखेड तालुका आयोजित आदर्श शिक्षक सत्कार, नवीन शिक्षक सत्कार व भव्य शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. बाहेर पाऊस असतानाही मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
यावेळी राज्याचे शिक्षक नेते आबासाहेब जगताप, सदिच्छाचे जिल्हा अध्यक्ष नारायण राऊत, एकनाथ व्यवहारे, आबासाहेब लोंढे, प्रतिभा साठे, संगिता कदम, रविंद्र पिंपळे, बबन गाडेकर, जालिंदर राऊत, शिवाजी शिंदे, महादेव गागर्डे, संजय पवार, त्र्यंबके, अशोक नेवसे, उमेदवार मल्हारी पारखे, अशोक राऊत, संतोष भोंडवे, बाळासाहेब मोरे, किरण गोरे, अर्जुन घोलप, सिद्धनाथ कचरे, संजय आरेकर, गणपत चव्हाण,
केशव कोल्हे, ज्ञानेश्वर कोळेकर, रामचंद्र गाढवे
तसेच महिला आघाडीच्या कामिनी राजगुरू, मनिषा घोलप, भोसले यांच्या सह अनेक शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिक्षक नेतेआबासाहेब जगताप म्हणाले की, नगर जिल्ह्यात जामखेडचे वेगळे स्थान आहे. जामखेड हा नेहमीच सदिच्छा बरोबर राहिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी रोहोकले व तांबे गटाचे वाभाडे काढले.
प्रवास भत्ता घेणार नाही म्हणून सांगितले व तिसऱ्या मिटींग पासून प्रवास भत्ता घेतला. जादा मेहनताना हडप केला घड्याळ खरेदीत मोठा भ्रष्टाचार केला.
एवढी मोठी बॅक असुन आँनलाईन कारभार नाही साॅफ्टवेअर नाही. गुरुमाऊली खुर्द व बुद्रुक झाले आहे. सत्ता सदिच्छा मंडळाचीच येणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदिच्छा मंडळाने जिल्हाध्यक्ष नारायण राऊत म्हणाले की,जामखेड तालुका हा सदिच्छाचा बालेकिल्ला आहे व राहणारच कारण बाहेर पाऊस असतानाही मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. दुसऱ्या मंडळाचे नेते जामखेड मध्ये येतात पण जामखेड मध्ये त्यांना काहीच हाती लागत नाही. कारण तालुका सदिच्छा बरोबर आहे.

यावेळी बोलताना आबासाहेब लोंढे म्हणाले की, आतापर्यंत गुरुमाऊली मंडळाला आँनलाईन बॅक करता आली नाही फक्त थापा मारल्या
माऊलीचे मवाली कधी झाले हे त्यांनाच कळले नाही. मतपत्रिका विषयी सविस्तर माहिती दिली

यावेळी कामिनी राजगुरू,एकनाथ व्यवहारे, आबासाहेब लोंढे, प्रतिभा साठे, रविंद्र पिंपळे, बबन गाडेकर यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी तर आभार नवसरे यांनी मानले. मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने सभासद शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

             चौकट

आजच्या मेळाव्याच्या गर्दी वरून पुन्हा एकदा जामखेड तालुक्यावर नारायण राऊत यांचं वर्चस्व आहे हे सिद्ध झाले आणि आघाडीचा विजय जवळ असल्याचे सभासदांनी दाखुन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here