शिऊर येथील बौद्धविहारचे बांधकाम आठ दिवसात सुरू न झाल्यास समाजबांधवांना घेऊन उपोषण करणार – पांडुरंग समुद्र

0
238

जामखेड न्युज——

शिऊर येथील बौद्धविहारचे बांधकाम आठ दिवसात सुरू न झाल्यास समाजबांधवांना घेऊन उपोषण करणार – पांडुरंग समुद्र

तालुक्यातील शिऊर येथील बौद्धविहारचे बांधकाम आठ दिवसात सुरू करावे अन्यथा समाजबांधवांना घेऊन दि. १८ रोजी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिऊर येथील पांडुरंग समुद्र यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर अरूण समुद्र, सोनाली समुद्र, लहु समुद्र, सचिन समुद्र, काळू समुद्र, बाळू समुद्र, प्रकाश समुद्र, आम्रपाली समुद्र, अशोक समुद्र, बाळू समुद्र, भगवान समुद्र, कुसुम समुद्र यांच्या सह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

पंचायत समिती, जामखेड मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत सन-२०२१-२२ साठी मौजे. शिऊर येथे बौध्द विहार बांधकाम करणे कामी १० लक्ष रुपयास मान्यता मिळालेली असुन, सदर बांधकामाची निविदा प्रक्रिया पुर्ण होऊन बुडाणबाबा मजूर स.सं.मर्या, पिंपरखेड, ता.जामखेड यांस कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर यांचे स्तरावरुन

दिनांक-०१/०७/२०२२ रोजी सदर बांधकाम करणेबाबत कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कार्यारंभ आदेशानुसार शर्ती / अटीसह व ठराविक कालावधीत बांधकाम सुरु करणेबाबत बहुजन समाजाच्या वतीने दिनांक १४/०९/२०२२ रोजी आपल्या कार्यालयास पत्र देण्यात आले होते. परंतु, आपल्या स्तरावरुन आजपर्यंत बांधकाम सुरु
करण्यात आलेले नाही. व कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसुन येत नाही.

तरी, आपणास विनंती करण्यात येत आहे की, बुडाणबाबा मजूर स.सं.मर्या, पिंपरखेड, ता.जामखेड यांना आपल्या स्तरावरुन बौध्दविहार बांधकाम ८ दिवसाच्या आत तात्काळ सुरु करणे बाबत अवगत करण्यात यावे. सदर बांधकाम स्थानिक व्यक्तीमार्फत (शिऊर गावातील व्यक्ती) सुरु न करण्याबाबत स्पष्ट सुचना देण्यात यावेत. जेणेकरुन भविष्यात बांधकामात अनियमिता, अपहार किंवा काही अडचणी निर्माण होणार नाही. यास्तव.

सदर बांधकाम आपल्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असल्याने बांधकाम वेळेत सुरु करावे तसेच बांधकाम वेळेत सुरु न झाल्यास संदर्भिय पत्रानुसार उपोषण/आंदोलन करण्याबाबत आपणास कळविण्यात आले होते. परंतु, आपल्या
स्तरावरुन आजपर्यंत बांधकाम सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर बांधकाम ८ दिवसाच्या आत सुरु करावे अन्यथा दिनांक १८/०१०/२०२२ (मंगळवार) रोजी आपल्या कार्यालयाच्या दालनात सर्व बहुजन समाज, शिऊर व बहुजन संघटना
सह आमरण उपोषण करण्यात येईल.

आपणास पुनःश्च विनंती करण्यात येते की, सदर निवेदनाची वेळेत दखल घेण्यात यावी व उपोषण कालावधीत उपोषणकर्ते यांच्याबाबतीत काही अनुचित प्रकार घडल्यास, सदर बाबीस आपल्या कार्यालयाची पुर्णता जबाबदारी राहील.
ही विनंती.

सदर निवेदनाच्या प्रती समाजकल्याण अधिकारी नगर, कार्यकारी अभियंता नगर, प्रातांधिकारी कर्जत, तहसीलदार जामखेड, पोलीस निरीक्षक जामखेड, गटविकास अधिकारी जामखेड, आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे, सर्व बहुजन संघटना यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here