Saturday, September 26, 2026
Home ताज्या बातम्या हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी...

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकतमध्ये भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह

0
338
हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त साकतमध्ये भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह

जामखेड न्युज——

महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या उत्साहात उद्या दिनांक १२ रोजी सुरूवात होत आहे.

सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

बुधवार दि. १२ रोजी ह. भ. प. अर्जुन महाराज मोटे पळशीकर जालना

 

गुरूवार दि. १३ रोजी ह. भ. प. दत्ता महाराज आंबीरटकर डिकसळ

शुक्रवार दि. १४ रोजी न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे वाघदरा बीड

शनिवार दि. १५ रोजी महेश महाराज माकणीकर लोहारा
रविवार दि. १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे आळंदी
सोमवार दि. १७ रोजी संजयजी महाराज देशमुख
मंगळवार दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे
तसेच मंगळावर १८ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच
बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल.

तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!