जामखेड न्युज——
नेत्याला खुश करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चमकोगीरी थांबवावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आ.रोहित पवार यांच्या कारखान्यावर योग्य ती कारवाई करा. -पै.शरद कार्ले (तालुकाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा) यांची मागणी.
काल दि. 10 ऑक्टो. आमदार राम शिंदे साहेब यांनी बारामती ॲग्रोच्या शेटफळगडे हा कारखाना शासकीय नियमाप्रमाने दिलेल्या वेळेच्या अगोदर चालू केला असता साखर आयुक्त यांना नियम मोडल्याबद्दल त्या कारखान्यावर योग्य ती कार्यवाही करावी करण्यासाठी निवेदन दिले.
आमदार राम शिंदे साहेब यांनी साखर आयुक्त, पुणे येथे कारवाईचे निवेदन दिल्यानंतर जामखेड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खर्डा येथे आ.प्रा.राम शिंदे साहेब यांच्या विरोधात घोषणाबाजी केली परंतु आ.रोहित पवार यांना खुश करण्यासाठी चमकोगिरी करत असल्याची टीका पै.शरद कार्ले यांनी केली आहे.
एकंदरीत शासकीय नियम मोडून कारखाने आधी चालू करायचे आणि आपल्या जवळच्या लोकांचा ऊस तोडून घ्यायचा आणि नंतर उशीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा ऊस राहिला आहे त्यांच्याकडून कमी भावामध्ये ऊस खरेदी करायचा अशी या सरंजामी कारखानदारांनी चालू केली आहे. वास्तविक सर्वांना नियम हे सारखेच असेल पाहिजेत. यांच्या या मनमानी कारभाराला शेतकरी पुत्र आ.राम शिंदे साहेब यांनी कारवाई करण्यासाठी निवेदन दिलेले आहे.
ज्यावेळी उसाचा हंगाम संपत येतो तरीदेखील सभासदांचा ऊस तोडला जात नाही आणि शेतकऱ्याला अडचणीत आणलं जातं अशावेळी शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी त्या टोळी मलकाला व यांच्या कारखान्याच्या लोकांना पैसे द्यावे लागतात आणि ऊस तोडून घ्यावा लागतो आणि मग याच काळात या शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते व कमी भावामध्ये ऊस खरेदी करण्याचे काम हे कारखानदार लोक करत असतात. याच्याच विरोधात आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक होणार आहे ती थांबवावी याकरिता हे निवेदन दिलेले आहे परंतु आमदाराच्या समोर कुठलंही विकासकाम प्रसिद्धीसाठी नाहीये व या कार्यकर्त्यांना कुठलीही किंमत राहिलेली नाहीये. आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी केलेल्या कुठल्याही मनमानी कारभार हा या कार्यकर्त्यांना दिसला नाही किंवा आमदार राम शिंदे साहेब यांनी मंजूर केलेली कामे आत्तापर्यंत करत आहेत याचे देखील या सर्व कार्यकर्त्यांनी भान ठेवावे तुम्ही जर चुकीला चूक म्हनु शकत नसाल तर ही चमकोगिरी करून काय साध्य करणार आहात.
आपल्याला किंमत यावी म्हणून हे तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आ.रोहित पवार यांच्या या मनमानी कारभाराचे समर्थन करून चमकोगिरी करण्याचं काम करत आहेत, परंतु जी शेतकऱ्यांची पिळवणूक भविष्यातली होणार आहे या संदर्भात या चमकू कार्यकर्त्यांना कुठलीही काळजी नाही. तरी आ.प्रा.राम शिंदे साहेब यांनी जे निवेदन दिले आहे याच्यावर सरकारने योग्य ती कार्यवाही करावी व अशा कारखानदारांवर किंवा अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे ही भारतीय जनता पार्टीच्या जामखेड तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.