माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे खर्ड्यात तीव्र निषेध.

0
179

 

जामखेड न्युज——

माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे खर्ड्यात तीव्र निषेध.

 

खर्डा येथील बसस्थानकासमोर आ.राम शिंदे यांनी बारामती एग्रो च्या साखर कारखान्याने सुरु केलेल्या गाळपाविरोधातील भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात आला.

आ.राम शिंदे यांनी आकसाचे व सुडाचे राजकारण करण्याऐवजी तसेच आ.रोहित पवार यांनी केलेल्या विकासकामांना स्थगिती आणणे, झालेल्या विकासकामांची चौकशी लावणे व त्यांच्या कारखान्याविरोधात आकसाने व सूडबुद्धीने कारवाई करण्याच्या व्यर्थ मागण्या करण्याऐवजी राज्यातील व केंद्रातील सत्तेचा वापर विधायक विकासकामे आणण्यासाठी करावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केले.

यावेळी आ.राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, कालच आ.राम शिंदे यांनी पुणे येथे साखर आयुक्तांची भेट घेत बारामती एग्रो च्या साखर कारखान्याने १५ ऑक्टोबर रोजी गाळप सुरु करण्याऐवजी दि.१० ऑक्टोबर रोजी सुरु केल्याचे कारण देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

वास्तविक पाहता महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रचंड प्रमाणांत ऊस उपलब्ध असल्याने ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच बारामती एग्रो सारख्या कारखान्याचे चोख नियोजनामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेवर मिळत असून इतर कारखान्यांपेक्षा भावही चांगला मिळतो त्यामुळे येथील शेतकरी याच कारखान्याला ऊस घालण्याबाबत आग्रही असतात.

त्यामुळे कारखाने जास्त काळ चालवणे गरजेचे आहे. बारामती एग्रो कारखान्याने या हंगामापासून गाळपाची क्षमता २००० मे.ट.ने वाढवली असल्याने जास्तीतजास्त शेतकऱ्यांचा ऊस येथे गाळप करता येईल अशी परिस्थिती असताना आ.राम शिंदे यांच्या अशा आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रपंचावरच घाला घातल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे यांनी केले.

यावेळी खर्ड्याचे सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, भिमराव लेंडे, प्रशांत वारे यांनी निषेधाची भाषणे केली.

यावेळी सोसायटीचे चेअरमन मुकुंद गोलेकर, संचालक संजय सुर्वे, तात्या ढेरे, राजू जिकरे, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, प्रकाश गोलेकर,गजेंद्र काळे,नरेंद्र जाधव, अमर चाऊस, कांतिलाल वाळुंजकर, ज्ञानेश्वर थोरात, बबन मदने, रमेश गोलेकर, मोहन भोसले, दादा ईपार, संतोष गंभिरे, सुरेश साळुंके, हरीदास गोलेकर, नितीन गोलेकर इ. उपस्थित होते.

आ.राम शिंदें 10 वर्षे सत्तेत असताना ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी साधं उसाच गुऱ्हाळ सुरू केलं नाही.त्यांनी बारामती अग्रो कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी हास्यास्पद आहे आ.रोहित पवार हे सतत शेतकऱ्यांना उसाचे दाम पदरात पाडण्यासाठी प्रयत्न करतात त्या मध्ये आ.शिंदे यांनी आडकाठी आणू नये अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here