जामखेड न्युज——
महेंद्र राळेभात आयोजित शिवक्रांती मित्रमंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन
जामखेड शहरातील शिक्षक काॅलनी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते महेंद्र राळेभात व त्यांच्या पत्नी आरतीताई राळेभात यांच्या वतीने महिला व मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी नऊ दिवसही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर या वर्षी सण उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे होत आहेत.
नवरात्र उत्सवानिमित्त शिक्षक काॅलनी येथील शिवक्रांती मित्रमंडळाच्या वतीने मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी नऊ दिवसही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.
शिक्षक काॅलनी येथील शिवक्रांती मित्रमंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, गरबा, दांडिया, उखाणे स्पर्धा, रांगोळी, लोकगीते यासह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या
युवक नेते महेंद्र राळेभात व त्यांच्या पत्नी आरतीताई राळेभात यांनी मुली व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात अनेक महिला व मुलींनी मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवला होता. तसेच कोजागिरी पोर्णिमा निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते.