जामखेड न्युज——
सर्वसामान्य शिक्षकांच्या सूचना पाळणे हाच माझा जाहीरनामा रावसाहेब रोहोकले
शाळा शाळा वर फिरताना शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवताना जे शिक्षक भेटतात,ज्या गोष्टी सांगतात त्या सोडवणे, अभ्यास करून त्या राबवणे हाच माझा जाहीरनामा असतो असे मत गुरुमाऊली रोहोकले गटाचे प्रमुख रावसाहेब रोहोकले यांनी व्यक्त केले.
नुसती आश्वासने देण्यापेक्षा ती राबवली पाहिजेत,पुढील काळात दोन टक्के फरकाने बँकेचा कारभार करू, विकास मंडळाचे अपूर्ण काम पूर्ण करू, सभादांच्या उपयोगी पडणारे जे जाहीरनाम्यात नसतील तरी अभ्यास करून सभासद सांगतील ते ते निर्णय राबवण्याचा प्रयत्न करू, आपण सर्वानी सभासदांचे हित जोपासले पाहिजे ,1300 कोटीं ठेवी असलेली शिक्षकाची कामधेनू जपली पाहिजे.
सभासदांना वेळेला आवश्यक तेवढे कर्ज उपलब्ध झाले पाहिजे, त्यास कमीतकमी व्याजदर असला पाहिजे, सभासदांच्या ठेवी व शेअर्स वर योग्य मोबदला मिळाला पाहिजे या सभासदांच्या अपेक्षा असतात व त्या मी साडेतीन वर्षात निश्चितपणे पूर्ण केल्या, विविध सभासदाभिमुख योजना आणल्या यामुळे सर्वसामान्य शिक्षक हा गुरुमाऊली मंडळासोबत आहे व जिल्ह्यात एकूण 5000 पेक्षा जास्त मतदान घेऊन गुरुमाऊली मंडळ विजयी होईल याची मला खात्री आहे असे उद्गार काल जामखेड येथील प्रचारादरम्यान त्यांनी रावसाहेब रोहोकले यांनी सांगितले.
काल जामखेड तालुक्यात प्रचारासाठी ते आले होते त्यावेळी त्यांनी तालुक्यातील काही शाळानां भेटी दिल्या तसेच जवळा, खर्डा व जामखेड येथे बैठका घेऊन सभासदांशी संवाद साधला,यावेळी त्यांच्यासोबत श्रीरामपूर येथील उर्दू माध्यम बँकेचे उमेदवार अल्ताब शाह, युवराज जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष राम निकम हेही तालुका दौऱ्यावर होते, यावेळी गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी सांगितले तालुक्याला दिलेले बँकेचे उमेदवार नारायण लहाने व विकास मंडळाचे उमेदवार वैजीनाथ गीते दोघेही सामान्य शिक्षक व सतत शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारे आहेत, त्यामुळे तालुक्यातील सामान्य सभासद हा त्यांचासोबत आहे ,रोहोकले गुरुजींना मानणारा येथे खूप मोठा वर्ग येथे आहे, सौ सीमा निकम यांनी संचालिका असतांना बँकेचा चांगला कारभार केला ,सभासदांची कसलीही अडवणूक न करता त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्न केले, त्यामुळे आम्ही तालुक्यातून 250 पेक्षा जास्त मतदान निश्चित स्वरूपात देऊ अशी खात्री त्यांनी दिली.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र मोहोळकर, महिला आघाडी अध्यक्ष मनीषा वाघ, सुभाष फसले ,नितेश महारनवर, विजयकुमार रेणुके, रुपेश वाणी, विकास हजारे, दत्ता कोल्हे, सुभाष सरोदे, अनिल कुलकर्णी, विठ्ठल पवार, संतोष वाढरे, आमरचंद चिंचकर ,शर्मिला मोटे, कल्पना पोटघन, मीना कांबळे,आदी शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते