जामखेड न्युज——
वन्यजीव सप्ताहनिमित्त तेलंगशी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन
जामखेड तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी येथे वन्यजीव सप्ताहनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी 1आॅक्टोबर ते 7 आॅक्टोबर हा कालावधी वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
वनपरिक्षेञ कर्जत ,सामाजिक वनीकरण विभाग जामखेड व जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यजीव सप्ताह निमित्त तेलंगशी शाळेत निबंध स्पर्धा व चिञकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण जामखेड एस एस.निरभवणे,वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत एम.एम,शेळके,मुख्याध्यापक केशव गायकवाड, तेलंगशी ग्रामपंचायत सदस्य भरत ढाळे, वनपाल जामखेड आर. एस.देवकर,पी.एस.उबाळे, वनरक्षक आर.एस. राठोड, व्हि.डी .नांदे ,ए..डी. ढाकणे,के. ई.पवार,वन कर्मचारी बापू जायभाय शहाजी नेहरकर,शिवाजी चिलगर ,राघू सुरवसे, राजाभाऊ मुरूमकर, शामराव डोंगरे ,फुलचंद बहिर ,कादर शेख ,भाऊसाहेब भोगल हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वनक्षेञपाल निरभवणे म्हणाले की, नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव आस्था वृद्धिंगत होऊन त्यांच्या अभिव्यक्तिस वाव देण्यासाठी वन्यजीव सप्ताह हा पर्यावरण समतोल उपक्रम राबविणे काळाची गरज आहे.विद्यार्थी व नागरिकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी व निसर्ग साखळीचे संतुलन राखण्यासाठी वन्यजीवांचे व वनांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.शाळेत आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत
प्रथम क्रमांक ॠतुजा सखाराम ढाळे इ.सातवी,द्वितीय क्रमांक अमृता कल्याण चौधरी इ.सहावी व तृतीय क्रमांक करण एकनाथ जायभाय इ.सातवी* यांनी पटकावला.*चिञकला स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी बाजीराव जायभाय इ.सातवी,द्वितीय क्रमांक अक्षता महारुद्र ढाळे इ.सातवी व तृतीय क्रमांक प्रतिक्षा बबन ढाळे इ.सातवी यांनी मिळविला.
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपञ व रोख स्वरुपात बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपाल आर.एस. देवकर यांनी , सूञसंचलन विजयकुमार रेणुके यांनी तर आभार केशव गायकवाड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंता गायकवाड,संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले,अशोक जाधव,प्रसाद भिसे व नितीन पवार* यांनी विशेष परिश्रम घेतले.