जामखेड न्युज——
अमित चिंतामणी जामखेडचा हिरा -डॉ.भगवानराव मुरूमकर
तुफान गर्दीत तेजश्री प्रधानच्या उपस्थितीत अमित चिंतामणी आयोजित ओपन गरबा दांडिया संपन्न!!!
अमित चिंतामणी यांनी आपल्या कामातून आपला प्रभाग मलबार हिल बनवला आहे. खरोखरच अमित चिंतामणी जामखेडचा हिरा आहे. क्राॅक्रिटीकरण, शंभर टक्के बंदिस्त गटारे व शंभर टक्के विद्युतीकरण व पाण्याची सोय असणारा प्रभाग १३ केला आहे. कामेही अत्यंत दर्जेदार केलेली आहेत.
कोजागिरी पोर्णिमा उत्सवानिमित्त सर्व महिलांसाठी दरवर्षी प्रमाणे ओपन गरबा दांडियाचे आयोजन नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केले होते या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे “होणार सुन मी या घरची ” मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने व अपेस्ट्रोपी डान्स अकेडमी व आकाश डान्स स्टुडिओ अ. नगर यांच्या डान्स परफॉर्मन्सने जामखेड करांची मने जिंकली कार्यक्रमासाठी तुफान गर्दी होती. ल. ना. होशिंग विद्यालयाचे मैदान खचाखच भरले होते.
या कार्यक्रमासाठी तेजश्री प्रधान हिचे खास आकर्षण होते. यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, खजिनदार राजेश मोरे, अशोक शिंगवी, प्राचार्य श्रीकांत होशिंग, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, अर्चना राळेभात, विलास चिंतामणी, माजी नगराध्यक्ष अर्चना राळेभात, प्रा. अरूण वराट, शरद कार्ले, रवी सुरवसे, पांडुरंग उबाळे, संतोष गव्हाळे, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, प्रांजल चिंतामणी, प्रविण चोरडिया, सचिन मासाळ, केदार रसाळ, प्रविण सानप, उमाकांत कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, मोहनमामा गडदे, सागर लोहकरे, नितीन जगताप, शिवकुमार डोंगरे, उत्तम बोडखे, उद्धव हुलगुंडे, अल्ताफ शेख, तुषार बोथरा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या विकास कामातून ओळख निर्माण करणारे प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक अमितभाऊ चिंतामणी यांनी प्रभागात शंभर टक्के क्राॅक्रिटीकरण, शंभर टक्के बंदिस्त गटारे व शंभर टक्के विद्युतीकरण व पाण्याची सोय असणारा प्रभाग १३ केला आहे. कामेही अत्यंत दर्जेदार केलेली आहेत. विकास कामाबरोबरच ते सामाजिक कामासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या नवरात्र उत्सव असल्याने शहरातील शेकडो महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडवून आणले आहे. सुमारे पन्नास गाड्या नेल्या होत्या हजारो महिलांना मोहटादेवीचे दर्शन घडविले.
नगरसेवक अमित चिंतामणी हे गेल्या आठ वर्षांपासून नवरात्र महोत्सवा निमित्ताने आपल्या प्रभाग क्रमांक तेरा मधिल महीला भाविकांना पाथर्डी येथील मोहटा देवीच्या दर्शनासाठी घेऊन जात असतात .याच अनुषंगाने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील नगरसेवक अमित चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महीला भाविकांना मोहटा देवी दर्शन घडविले होते तसेच दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा उत्सवानिमित्त ओपन गरबा दांडियाचे आयोजन करत असतात. या वर्षी तर
नगर जिल्ह्यात पहिल्यांदा जामखेड शहरात तेजश्री प्रधान यांना आणले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीलंका होंशिग होते
प्रस्ताविक आयोजक अमित चिंतामणी यांनी केले
यावेळी बोलताना ते म्हणाले दरवर्षी आपण अधिक बहारदार कार्यक्रम घेऊ.
यावेळी बोलताना डॉ. भगवानराव मुरूमकर म्हणाले की. अमित चिंतामणी हे शहरातील हिरा आहेत. आणी त्यांचा प्रभाग म्हणजे मलबार हिल आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, रवी सुरवसे, प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
तेजश्री प्रधान यांनी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
निवेदक निलेश दिवटे यांनी कार्यक्रमाचे छान सुत्रसंचालन केले.