जामखेड न्युज——
कारला एस टी बसची धडक; ५ जणांचा जागीच मृत्यु!!!
तुळजापूरहून देवदर्शन घेऊन जाणार्या कारला एस टी बसची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात उदगीर – नळेगाव रस्त्यावरील हैबतपूरच्या पुढे मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खासगी कारमधील ठार झालेले पाचही जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते.
याबाबतची माहिती अशी, उदगीर आगाराची बस आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता चाकूरकडे रवाना झाली होती.
उदगीरमधील एक खासगी कार तुळजापूरहून देवदर्शन करुन परत येत होती. बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूरहून परत येणार्या कारने वेगाने बसला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील ५ जण जागीच ठार झाले. बसमधील १० जण जखमी झाले असून त्यांना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.