जामखेड न्युज——सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी घडविले शेकडो महिलांना मोहटादेवीचे दर्शन
दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर या वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे यासाठी परिसरातील शेकडो महिलांना सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी मोहटादेवीचे दर्शन घडविले. चार बस व काही खाजगी वाहनांच्या साहाय्याने शेकडो महिला व अनेक युवक कार्यकर्ते यांना दर्शन घडविले आहे. सुमारे पाचशे महिला व युवक यांना दर्शन मिळाल्याने सर्वानी रमेश आजबे यांचे आभार मानले.

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त समाजसेवक रमेश दादा आजबे यांच्यामार्फत मोहटा देवी दर्शनासाठी एसटी बस देण्यात आल्या ५०० लोकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.

यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, सुर्यकांत मोरे, शहाजीकाका राळेभात, सुनील उगले यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.

यावेळी चंद्रकांत आजबे, युनूस भाई सय्यद, दादासाहेब ढवळे, अंगद सांगळे, सचिन खैरे, तात्या कदम,गणेश कार्ले, मनोज डाडर, राजेंद्र भाऊ आजबे सुरज राऊत, आकाश पोकळे, भाऊ फुंदे इ. मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी आतापर्यंत जामखेड शहरासह झिक्री, या गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यांनी स्वच्छतेच्या कामात स्वतः ला झोकुन देत परिसरातील नागरिकांना एकत्र करून श्रमदानातून परिसर स्वच्छ केला आहे.
रमेश आजबे यांनी आतापर्यंत पदरमोड करून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. स्वतःच्या गावाबरोबर मामाचे गावही लोकसहभागातून आदर्श केले बिनविरोध निवडणूका, मंदिराचा जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी मुरमीकरण, पेव्हिंग ब्लाॅक, बंदिस्त गटारे, लाईट ची कामे, ल. ना. होशिंगचा अनेक दिवसांपासून बंद असलेला रस्ता चालू करत पेव्हिंग ब्लॉक बसवले,
आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा केला मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले, ग्रामीण रूग्णालयात बोअरवेल घेतल्याने व मोटार बसविल्याने पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली. शहराच्या स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखला जावा शहर हिरवाईने नटावे याकरिता मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर झाडे लावली झाडांना टॅंकरने पाणी घातले व संरक्षक जाळी बसवली त्यामुळे हरित जामखेड होऊ लागले आहे.
त्यांनी लावलेल्या झाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झाडांचे आळे साफसफाई करत टॅकरद्वारे पाणी घातले. या सर्व उपक्रमामुळे थोड्याच दिवसांत स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड उदयास येत आहे.