जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते शेरखान अकबर खान पठाण यांची मुस्लिम विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख प्रा . कैलास माने, गणेश माने, गणेश गायकवाड, अंगद सांगळे, जुबेर शेख, बाला समुद्र, खान साहेब, अल्ताफ शेख यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेरखान पठाण यांना निवडीचे पत्र सत्तार ईनामदार संस्थापक तथा प्रदेश अधक्ष मुस्लीम विकास परिषद महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे समाजाच्या अडीअडचणी सुटण्यासाठी मदत होईल असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शेरखान पठाण यांचीनियुक्ती मुस्लीम विकास परिषदच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी करण्यात येत आहे. सदर पदाच्या अधिकाराचा वापर समाजाच्या हितासाठी व मुस्लीम विकास परिषदेच्या भरीव कामासाठी व संघटनेचे कार्य जनतेपर्यंत पोहचून समाजाचा विकास करण्यासाठी पदाचा उपयोग होईल असे बोलले जात आहे.
शेरखान पठाण यांची नियुक्ती होताच विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.