घोडा मैदान दूर नाही, कोण किती पाण्यात आहे ते समजेल-एकनाथ (दादा) चव्हाण

0
303
जामखेड न्युज——
घोडा मैदान दूर नाही,कोण किती पाण्यात आहे ते समजेल-एकनाथ (दादा)चव्हाण
                    गेले काही दिवस व्हाट्सअप वरती बँकेच्या संदर्भात अनेक जणांचे अनेक मेसेज वाचून सर्वसामान्य सभासद आर्थिक आकड्यांच्या ताळेबंदात किंवा कोटी कोटी आकड्यांच्या गोंधळात न पडता फक्त एकच विचार करतो आपली बँक सव्वा टक्याच्या फरकत चालली हीच फार मोठी जमेची बाजू पूर्वी बँक तीन टक्के किंवा चार टक्के यामध्ये केव्हा चालेल याचा विचार करता करता अनेक शिक्षक बांधव रिटायर झाले. 
 परंतु बँक नेहमी फार मोठा फरक ठेवून का बरं चालली असावी असा प्रश्न त्या मंडळींना आता पडलेला आहे त्यांच्या सेवेतील कष्टाचा पैसा कर्जाचे व्याज भरता भरता अर्थात घोटाळे भरता भरता गेला परंतु बँक तीन  टक्के फरक ठेवून चालेल माझा पैसा वाचेल असा विचार करून करून मायबाप सभासद रिटायर झाले पण तथाकथित बँकेची पुढारी वठणीवर आले नाही बापू सारखा माणूस जर बँक सव्वा टक्के फरक ठेवून चालवतो. फक्त हेच पाहिजे आम्हाला नको ती व्हाट्सअप वरली आकडेमोड नको तो ताळेबंद बापूसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एवढेच सामान्य सभासद म्हणत आहे सर्व बँकेचे कार्यरत असणारे पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी खरोखरच चांगला कारभार केलेला आहे हे स्तुतिपाठक म्हणून म्हणत नाही तर चांगल्याला चांगलं म्हणावं एवढच…….!!!!!
 मिडियाला बातमी आली की जामखेड मधून गुरूमाऊली मंडळ2015 तांबे गट 300 मतदान घेवून आघाडी घेणार तेंव्हा इतर मंडळातील मित्र मंडळ म्हणायला लागले.”तीनशे नाही पण तुम्हाला दोनशे पडतील बुवा…!!!” पण सर्वसामान्य सभासदाचे फोन आले.मॅसेज आले.प्रत्यक्ष भेटी झाल्या.त्यांचे मत आले की “कारभार एकच नंबर झाला.डेव्हींडंड चांगला भेटला,ठेवीवर व्याज चांगले भेटले.व्याजदर असाच राहिला तरी लय झाले.सभासदाला स्वतःचे हित कळते.जामखेडमधून 300 मतदान गुरूमाऊली2015 होईल.” जामखेडचा इतिहास 90% मतदान एकमुखी झाल्याचा आहे.300 ने 69%पर्यंतच टक्केवारी जाते.त्यामुळे फार अशक्य असे काही नाही.    
    ना सत्तेसाठी…..
ना स्वार्थासाठी…..
_ना नातेवाईकांसाठी_
 आपली लढाई फक्त…. सभासद हितासाठी
एकनाथ(दादा)चव्हाण 
अध्यक्ष्य जामखेड तालुका प्राथ.शिक्षक संघ 
☂️जय संघ,जय ऐक्य,जय शिक्षक भारती,जय एकल,जय गुरूमाऊली☂️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here