अँड.डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याच्या मागणीसाठी उद्या खर्डा येथे रास्तारोको आंदोलन

0
172
जामखेड न्युज——
अनेक वर्षापासून मागणी करूनही  शिकारे वस्ती,बाळगव्हाण महाणवर वस्ती (लक्ष्मी नगर वाकी) या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे दररोज शाळेतील 60 ते 70 विद्यार्थी, विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाताना त्रास होत आहे. तसेच खर्डा ते धनेगाव (धाकटी पंढरी) हा रस्ता सुद्धा खराब झाला आहे या रस्त्यावरून अनेक अपघात होऊन महिला व नागरिक जखमी झाले आहेत याचेही रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी माहिती अँड.डॉ.अरुण जाधव यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली
याबाबत माहिती अशी की, उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भटके विमुक्त राज्य समन्वयक अँड.डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली व वाकीचे सरपंच नानासाहेब वायकर, लोणी चे सरपंच रघुनाथ परकड, माजी सरपंच सिद्धेश्वर शेंडकर, बाळगव्हाणचे माजी सरपंच दादासाहेब दाताळ पाटील, शहाजी सोनवणे, लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू मोहोळ, दिघोळचे भारत शिंदे, गणपत कराळे, अण्णा शिकारे व लोक अधिकारांदोलनाचे तालुकाध्यक्ष विशाल पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे.
 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षापासून मागणी करूनही  शिकारे वस्ती,बाळगव्हाण महाणवर वस्ती (लक्ष्मी नगर वाकी) या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे दररोज शाळेतील 60 ते 70 विद्यार्थी, विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाताना त्रास होत आहे. तसेच खर्डा ते धनेगाव (धाकटी पंढरी) हा रस्ता सुद्धा खराब झाला आहे या रस्त्यावरून अनेक अपघात होऊन महिला व नागरिक जखमी झाले आहेत याचेही रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
कर्जत जामखेड मतदार संघासाठी दोन आमदार व एक खासदार असतानाही हे महत्त्वाचे रस्ते रखडलेच कसे असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे.
या रस्त्याच्या कामासाठी उठा जागे व्हा. रास्ता रोको आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी व्हा अशी विनंती आयोजकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर भीमा सुरवसे, द्वारकाताई पवार, आजिनाथ शिंदे,परमेश्वर काळे, सुनिता कांबळे, नितीन आहेर, संतोष चव्हाण, गौरव बागडे,कांतीलाल जाधव, अविनाश काळे, दादा गायकवाड लक्ष्मण वाळके यांच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर,सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर, गटविकास अधिकारी साहेब जामखेड, सार्वजनिक बांधकाम विभाग जामखेड, पोलीस निरीक्षक साहेब खर्डा पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here