Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडला येणार रेल्वे!! पण कोणाचेही घर तुटणार नाही नवीन सर्वे होणार -आमदार...

जामखेडला येणार रेल्वे!! पण कोणाचेही घर तुटणार नाही नवीन सर्वे होणार -आमदार रोहित पवार

0
375

जामखेड न्युज——

जामखेडला येणार रेल्वे!!
पण कोणाचेही घर तुटणार नाही नवीन सर्वे होणार -आमदार रोहित पवार

शेजारी आष्टी पर्यंत रेल्वे आली आहे जामखेडला रेल्वे येणार आगोदर जामखेड शहरातून रेल्वे सर्वे झालेला होता रेल्वे मुळे कोणाचेही घर तुटणार नाही याची पुर्ण काळजी घेतली जाईल यासाठी सहा महिन्यांपुर्वीच केंद्रीय रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना भेटलो आहे असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

शनिवारी दैनिक सुर्योदयचा आठवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवारांनी रेल्वे संदर्भात माहिती दिली. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, अमोल गिरमे, अभय शिंगवी, महावीर बाफना, उमर कुरेशी, सुंदरदास बिरंगळ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सहा महिन्यात पुर्वी मी रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना भेटून जामखेड रेल्वे बाबत मागणी केली आहे. आगोदर जामखेड शहरातून रेल्वे सर्वे झालेला होता यामुळे अनेक घरे जात होती. लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. याबाबत शहरातील नागरिकांनी आपल्या कडे तक्रार केली होती.

त्यामुळे जामखेडला रेल्वे येणार पण कोणाचेही घर तुटणार नाही यासाठी नवीन सर्वे होणार असे आश्वासन आमदार रोहित पवारांनी पत्रकारांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!