जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहा हद्दीतील एक खासगी उच्च माध्यमीक विदयालय मोहा येथुन या घटनेतील फिर्यादी पिडीता पायी घरी जात असताना आरोपीने मोटारसायकलवर येऊन तिचा विनयभंग केल्याची घटना काल दि. २१ सप्टेंबर रोजी घडली आहे.
या बाबत सविस्तर असे की, या घटनेतील पिडीता परिसरातील एक खाजगी उच्च माध्यमीक विदयालय मोहा येथुन पायी घरी जात असताना निसर्गराज हॉटेलचे पुढे वडाचे झाडाचे जवळ असताना यातील आरोपी सचिन राजेंद्र बांगर याने मोटारसायकलवर येवुन फिर्यादीचा डावा हात धरुन शेताकडे ओढुन, फिर्यादीचे तोंडात हाताने चापटाने मारुन, वगैरे फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने पिडीतेचा विनयभंग केला.
यावरून दिलेल्या दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. व कलम :- 443/2022 भा द वि क , 354, 354(ड), 323,बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधि.2012 चे क 12 प्रमाणे आरोपी सचिन राजेंद्र बांगर रा. रेडेवाडी याचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.
यावरून असे दिसते की, ग्रामीण भागातील मुली किंवा महिला अजूनही सुरक्षित फिरू शकत नाही. आरोपी सचिन राजेंद्र बांगर याचे विरूद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी पिडीचेच्या कुटुंबीयांनी केली आहे.