जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——पाटोदा परिसरातून बैलजोडी चोरीला
बैलजोडी चोरीच्या घटना वाढल्या बळीराजा चिंतेत
जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथुन महादेव दत्तु गव्हाणे यांची बैल जोडी चोरीला गेली आहे. मागच्या पंधरा दिवसा पुर्वी पाटोदा येथुन बापू महाजन यांची बैल जोडी चोरीला गेली होती.

पाटोदा अरणगाव येथुन आतापर्यंत पाच सहा बैल जोडी चोरीला गेली आहेत. त्याची जामखेड पोलीसांनी दखल घ्यावी व अशा घटना होऊ नये यासाठी काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी पाटोदा सरपंच अशोक गव्हाणे ग्रा सदस्य पंढरीनाथ शिकारे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.

“बळीराजा दुहेरी संकटात”
एकीकडे लंम्पी स्कीनचा धोका यात बळीराजा हैराण झालेला असताना आता बैल चोरीच्या घटना वाढल्या आहेत यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.





