सैराट मधील आर्चीचा भाऊ प्रिन्सला राहुरी पोलिस ठोकणार बेड्या?

0
232

जामखेड न्युज——

सैराट मधील आर्चीचा भाऊ प्रिन्सला राहुरी पोलिस ठोकणार बेड्या?

 

मंत्रालयात नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून एका तरूणाची पाच लाख रूपयांची फसवणूक करण्याची घटना दिनांक ८ सप्टेंबर रोजी विद्यापीठ परिसरात घडली होती. या प्रकरणात आता पर्यंत तिघां जणांना ताब्यात घेतले असून या गुन्ह्यात सैराट चित्रपटातील सूरज पवार ऊर्फ प्रिन्स हा आरोपी असल्याचे दिसून येत आहे.

नेवासा तालूक्यातील भेंडा बुद्रुक येथील महेश बाळकृष्ण वाघडकर, वय २५ वर्षे. या तरूणा बरोबर संबंधित फसवणूक करणाऱ्या इसमाने ओळख करून घेतली होती. त्यावेळी त्याने मुंबई येथे मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीस आहे असे सांगीतले होते. तसेच वारंवार बोल बचन करून त्या भामट्याने महेश वाघडकर याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याला सांगीतले कि, आमच्याकडे रिक्त पदासाठी जागा सोडतात. त्या रिक्त पदावर मी तुझे काम करतो. पाच लाख रूपये भरावे लागतील. असे त्याला नोकरीचे आमिष दाखवले. सुरूवातीला दोन लाख रूपये घेतले आणि नियुक्तीपत्र आल्यावर तीन लाख रूपये द्यावे लागतील. असा व्यवहार ठरला.


दिनांक ८ सप्टेंबर रोजी त्या भामट्याने सकाळीच महेश ला फोन करुन सांगीतले. तूझी ऑर्डर आली. पैसे घेऊन राहुरी विद्यापीठातील विश्रामगृहात ये. महेश वाघडकर या तरूणाला संशय आल्याने तो राहुरी पोलिस ठाण्यात आला. आणि पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना सविस्तर माहिती दिली. दराडे यांनी पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पोलिस शिपाई गणेश लिपणे शशिकांत वाघमारे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने विद्यापीठ येथील गेस्ट हाऊस परिसरात सापळा लावून दत्तात्रय अरूण शिरसागर या भामट्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र त्याचे साथीदार आकाश विष्णू शिंदे व इतर पसार झाले.


महेश बाळकृष्ण वाघडकर याच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय अरूण शिरसागर, वय ३१ वर्षे, राहणार दत्तनगर, मालेगाव बस स्थानक. व आकाश विष्णू शिंदे, राहणार संगमनेर तसेच त्यांचे इतर साथीदारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणातील फरार अरोपी आकाश विष्णू शिंदे याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्याने सांगीतल्या प्रमाणे मंत्रालयाचे बनावट शिक्के बनवीणारा संगमनेर येथील ओमकार नंदकुमार तरटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस पथकाने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता. मंत्रालयाचे बनावट शिक्के बनवीण्यासाठी सैराट चित्रपटातील प्रिन्स म्हणजे सूरज पवार हा आला होता. त्याने सैराट चित्रपटाचे डायरेक्टर नागराज मंजूळे यांच्याशी बोलणे करून देतो. असे सांगून एका व्यक्तीला फोन लावून बोलणे करून दिले. ती व्यक्ती नागराज मंजूळे असल्याचे सांगून बोलली. शिक्के हे कोणत्याही गैरवापरा करीता वापरणार नसल्याचे सांगून शिक्के बनवून द्या, असे सांगितले.

अशी माहिती आरोपींनी दिली. पोलिस पथक आता सूरज पवार ऊर्फ प्रिन्स याला अटक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here